महाशिवरात्री काहीच दिवसांमध्ये साजरी होणार आहे. २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. त्यानिमित्त बॉलिवूड सुपरस्टारने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा अभिनेता शिवलिंगाला कवटाळून बसला आहे. याशिवाय सभोवताली फुलांची उधळण होताना दिसतेय. या अभिनेत्याचं महाशिवरात्रीनिमित्त खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. तुम्ही ओळखलंत का या सुपरस्टार अभिनेत्याला? हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अक्षय कुमार (akshay kumar)
अक्षय कुमारचं महाशिवरात्रीनिमित्त खास गाणं
अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर याविषयी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो शिवभक्ताच्या रुपात पाहायला मिळतोय. पोस्टरमध्ये दिसतं की अक्षयने शिवलिंगाला हृदयाशी कवटाळलं आहे. याशिवाय त्याच्याभोवती रंगांची उधळण होताना दिसतेय. ॐ नमः शिवाय! महाकालची शक्ती आणि भक्तीचा अनुभव असं कॅप्शन देऊन अक्षयने हे पोस्टर शेअर केलंय. 'महाकाल चलो' असं या गाण्याचं नाव आहे. महाशिवरात्रीनिमित्त १८ फेब्रुवारीला हे गाणं रिलीज होणार आहे.
महाकाल चलो गाण्याविषयी
भगवान शंकराच्या भक्तीला समर्पित या गाण्यात अक्षय कुमार दिसणार आहे. इतकंच नव्हे अक्षयने हे गाणं गायलं असून पलाश सेन आणि विक्रम मोंट्रो यांनीही अक्षयच्या जोडीने हे गाणं गायलं आहे. शेखर अस्तित्व यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. २६ फेब्रुवारीला येणाऱ्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिनानिमित्त हे गाणं रिलीज केलं जाणार आहे. पोस्टर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांना १८ फेब्रुवारीला हे गाणं ऐकण्याची उत्सुकता आहे.