Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारचा 'सरफिरा' सिनेमा या दिवशी OTT वर होतोय रिलीज! कुठे पाहायला मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 18:41 IST

अक्षय कुमारचा 'सरफिरा' हा सिनेमा या तारखेला या ओटीटीवर रिलीज होतोय (sarfira)

अक्षय कुमारचे सिनेमे म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. अक्षय कुमारचे गेल्या काही महिन्यांत आलेले अनेक सिनेमे थिएटरमध्ये फ्लॉप ठरले आहेत. अक्षय कुमारचा असाच एक न चाललेला सिनेमा म्हणजे 'सरफिरा'. साऊथ सिनेमाचा रिमेक असलेला 'सरफिरा' सिनेमा चांगला असूनही थिएटरमध्ये फ्लॉप ठरला. परंतु या सिनेमाचा अनुभव प्रेक्षकांना आता घरबसल्या मिळणार आहे. 'सरफिरा' आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे.

'सरफिरा' सिनेमा या ओटीटीवर होणार रिलीज

अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर 'सरफिरा' सिनेमाच्या ओटीटी रिलीजविषयी खास पोस्ट लिहिली आहे. 'सरफिरा' सिनेमा ११ ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज होतोय. डिस्ने+हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होतोय. अक्षय कुमारच्या चाहत्यांना हा सिनेमा घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे. अक्षय कुमारने 'सरफिरा' सिनेमात जो अभिनय केलाय त्याचं खूप कौतुक झालं. पण सिनेमा थिएटरमध्ये इतका चालला नाही.

'सरफिरा' सिनेमाविषयी

'सरफिरा' सिनेमाविषयी सांगायचं झालं तर या सिनेमात अक्षय कुमारसोबत परेश रावलराधिका मदन, आर. सरथ कुमार आणि सीमा बिस्वास हे कलाकार झळकले. याशिवाय मराठी अभिनेत्री इरावती हर्षे सिनेमात खास भूमिकेत पाहायला मिळल्या. अक्षय कुमार आणि परेश रावल या सिनेमानिमित्ताने तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र आले. 'सराफिरा' सिनेमाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं. १२ जुलैला 'सरफिरा' थिएटरमध्ये रिलीज झाला होता.

टॅग्स :अक्षय कुमारराधिका मदन