Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा धर्मेंद्र यांच्या अतिशय क्लोज आहे बॉबी देओल मुलगा आर्यमान, लाईमलाईटपासून राहतो दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 14:48 IST

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ ...

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. आपल्या आय् वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. मात्र यांत एक स्टार किड अपवाद ठरला आहे. स्टारकिड्स खूप चर्चेत असताना बॉबी देओलचा मुलगा आर्यमान मात्र फारसा चर्चेत आला नाही.

आर्यमानचे लुक्स आणि त्याची पर्सनालिटी पाहता तो बॉलिवूडसाठी एक चांगला चेहरा असल्याचे नेटीझन्स म्हणाले होते. एकंदरितच त्याच्यावर सारेच फिदा होताना दिसतायेत. बॉबी देओलचा मुलगा आर्यमान देओलदेखील त्याच्या इतकाच हँडसम आहे.  आर्यमान इतर स्टाककिड्स पेक्षा वेगळा आहे. मीडियापासून आणि लाईम लाईटपासून तो दूर राहणं पसंत करतो.

आर्यमानची पहिली झलक  बॅंकॉकमध्ये झालेल्या IIFA सोहळ्यावेळी बघायला मिळाली होती. बॉबीसोबत आर्यमान आला होता. आजोबा धर्मेंद्र यांचा आर्यमान फार लाडका असून अत्यंत जवळ आहे. आर्यमान अनेक वेळा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आर्यमानने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

टॅग्स :बॉबी देओल