चित्रपटात रोल मिळवण्यासाठी अभिनेत्यांना काय काय नाही करावे लागत. आता हॉलिवूड स्टार ईथन हॉकचेच उदाहरण घ्या ना. ‘बिफोर सनसेट’ फेम ईथनने आगामी चित्रपट ‘द मॅग्नेफिशियंट सेव्हन’मध्ये काम करण्यासाठी दिग्दर्शक मित्र अॅन्ट्वॉन फ्युकाला आपल्या मैत्रीबद्दल इमोशनल ब्लॅकमेल केले. तो सांगतो, ‘‘मला जेव्हा कळाले की, अॅन्ट्वॉन आणि डेन्झेल वॉशिंग्टन या चित्रपटावर काम करत आहे तेव्हा मी त्याला मी प्रेमाने धमकी दिली की, सिनेमात सात भूमिका आहेत. तू मला एकासाठी तरी घ्यायलाच हवं नाही तर आपली मैत्री संपली असेच समज.’’ साठच्या दशकातील वेस्टर्न फिल्म ‘द मॅग्नेफिशियंट सेव्हन’चा हा सिनेमा रिमेक आहे. एका गावाला दरोडेखोरांच्या त्रासापासून वाचविण्यासाठी डेन्झेलचे पात्र सहा अतरंगी लोकांना एकत्र करून लढा देतो अशी साधारण याची कथा आहे.विशेष म्हणजे मूळ सिनेमादेखील ‘सेव्हन समुराई’ या अकिरा कुरोसाव्हा दिग्दर्शित चित्रपटाचा रिमेक होता. एक मजेशीर गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमात माईलस्टोन ठरलेला ‘शोले’सुद्धा त्याचा रिमेक आहे. येत्या 23 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
भूमिकेसाठी ईथनने केले दिग्दर्शकाला ब्लॅकमेल
By admin | Updated: September 19, 2016 02:08 IST