Join us
Daily Top 2Weekly Top 5

RSS वरील चित्रपटासाठी भाजपाचे 100 कोटींचे फंडींग? बाहुबलीचे लेखक लिहणार कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:04 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवला जाणार आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर चित्रपट येणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी भाजपा 100 कोटींचे फडींग करणार आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवला जाणार आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत बाहुबलीसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिणारे प्रसिद्ध लेखक विजयेंद्र प्रसाद कथा लिहिणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजप स्वतः या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार आहे.  या चित्रपटामध्ये संघाची स्थापना ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी भाजपाने दाखवली असून हा प्रोजेक्ट सुमारे 100 कोटी रुपयांचा असणार आहे. संघाच्या समोर आलेली संकटे आणि त्यांच्या यशापयशावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सचा विचार केला जात आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, लवकरच याची ऑफिशियल घोषणा केली जाणार आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपा