Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्यांना भेटताना आमिर खान चुकला! भाजपा आमदाराची थेट पोलिसात तक्रार

By रूपाली मुधोळकर | Updated: November 1, 2020 14:08 IST

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ठळक मुद्देअलीकडे ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटींगदरम्यान आमिरला दुखापत झाली होती.  काही अ‍ॅक्शन दृश्यांच्या शूटिंगदरम्यान त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली होती.  

आमिर खान सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे या चित्रपटाच्या काही सीन्सचे शूटींग सुुरू आहे. पण या शूटींगदरम्यान एका वादाला तोंड फुटले आहे. केवळ वाद नाही तर याप्रकरणी आमिरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.  कोव्हिड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरणआमिर खान गाझियाबादेत शूटींग करतोय, म्हटल्यावर चाहते उत्सुक झालेत आणि शूटींग स्थळी मोठी गर्दी जमली. आमिरची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येत शूटींगस्थळी धाव घेतली. आमिरही आपल्या चाहत्यांना नाराज न करता त्यांना भेटला. पण यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली. चाहत्यांना भेटताना त्याने ना तोंडावर मास्क लावला ना फेसशिल्फ लावले.

भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी आमिरच्या या वागण्यावर तीव्र आक्षेप घेत थेट त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. देशात कोरोना संक्रमण आटोक्यात असले तरी धोका कायम आहे. अशात सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र आमिरने मास्क न लावून कोव्हिड प्रोटोकॉल मोडला, असा आरोप नंद किशोर गुर्जर यांनी केला.  

अलीकडे ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटींगदरम्यान आमिरला दुखापत झाली होती.  काही अ‍ॅक्शन दृश्यांच्या शूटिंगदरम्यान त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली होती.   या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  ‘लाल सिंह चड्ढा’  हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

या सिनेमाच्या शूटिंगसाठी गाजियाबादमध्ये पोहोचला आमिर खान, कुणाला कोनाकान नाही झाली खबर

सुमित राघवनला पटलं नाही आमिर खानचं 'शिंदे' आडनावाला 'शिंडे' बोलणं, ट्विट करत व्यक्त केली खंत

टॅग्स :आमिर खान