स्व. अनंत विष्णु म्हणजेच स्व. बाबुराव गोखले यांच्या जन्मशताब्दी वषार्चे औचित्य साधून त्यांचं महाराष्ट्रात तुफान लोकप्रिय ठरलेलं स्वत: बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दजेर्दार विनोदी नाटक ‘करायला गेलो एक’ पुन्हा नव्याने रंगभूमीवर येत आहे. निर्माते किशोर सावंत आणि विवेक नाईक यांनी ‘किवि प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली या नाटकाची निर्मिती केली आहे.करायला गेलो एक आणि झालं भलतंच... असं आपण गंमतीने म्हणत असलो तरी प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक गंमतीचे प्रसंग अनुभवास येत असतात. अशाच गंमतीशीर प्रसंगावर आधारित हे नाटक बेतलं आहे. या नाटकात मनोरंजनाचे फुल पॅकेज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्व. बाबुराव गोखले लिखित हया नाटकाचे दिग्दर्शन चित्रपट मालिका आणि नाट्यक्षेत्र अशा सर्व ठिकाणी आपला दजेर्दार ठसा उमटवलेले लोकप्रिय अभिनेते विजय गोखले करीत आहेत. ‘करायला गेलो एक’ या नाटकात स्वत: बाबुराव गोखलेंनी गाजवलेली मध्यवर्ती भुमिका विनोदाचे बादशाह प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले साकारत आहेत. नवीन पिढीतील अनेक मालिकांमधून गाजलेले विनोदाचे ह्यकल्लाह्ण कार मीरा मोडक (नियती राजवाडे) व निर्मळ विनोदाचे भान असलेला अतुल तोडणकर यांच्या विनोदाचा मस्त धुमाकूळही या नाटकात अनुभवायला मिळेल. याशिवाय किशोर सावंत, विजया महाजन, रेणुका वर्तक, सोनल सांगेकर, विक्रम आणि सुनील जोशी यांच्याही यात भुमिका असणार आहेत. हया नाटकाचे नेपथ्य उल्हास सुर्वे यांचे तर प्रकाश योजना पुंडलिक सानप यांची आहे. पार्श्वसंगीत सृजन झ्र प्रीतीश ही नवीन जोडी करत आहे. व्यवस्थापक प्रवीण दळवी असून सुत्रधार भालचंद्र नाईक व मोहन कुलकर्णी आहेत. अनेक वर्ष रसिकांना आनंद दिलेले हे नाटक यापुढेही तीच आनंदाची परंपरा कायम ठेवेल अशी निर्माते दिग्दर्शकांना आशा आहे.
विनोदाची खणखणीत फटकेबाजी!
By admin | Updated: February 5, 2016 02:28 IST