Join us  

birthday special : करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या तब्बूची प्रत्येक प्रेमकहाणी राहिली अधुरी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 8:00 AM

Tabu birthday special: करोडो चाहत्यांची ‘धडकन’ असणारी अभिनेत्री तब्बूचा आज वाढदिवस. तब्बूने वयाची पन्नासी ओलांडलीये. पण तिची क्रेझ आजही कायम आहे.

करोडो चाहत्यांची ‘धडकन’ असणारी अभिनेत्री तब्बूचा (Tabu) आज वाढदिवस.  तब्बूने वयाची पन्नासी ओलांडलीये. पण तिची क्रेझ आजही कायम आहे. वाढत्या वयाची एकही खुण तिच्या चेह-यावर दिसत नाही. उलट वाढत्या वयासोबत ती  अधिकाधिक सुंदर होत आहे. तब्बूचा जन्म मूळचा हैदराबादचा.  वयाच्या चौदाव्या वषार्पासूनच तब्बूने सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. आजही रूपेरी पडद्यावरचा तिचा प्रवास अव्याहत सुरूच आहे.  ‘हम नौजवान’मध्ये एक छोटीशी भूमिका मिळाली आणि यानंतर काय तर एकापेक्षा एक सरस सिनेमे मिळत गेले आणि पाहता पाहता तब्बू आघाडीची अभिनेत्री बनली. सिनेकरिअरमध्ये फार काही चढऊतार तिच्या वाट्याला आले नाहीत. पण खासगी आयुष्यात मात्र ती जरा कमनशिबी ठरली. होय, पडद्यावर जवळपास प्रत्येक हिरोसोबत ती दिसली. पण ख-या आयुष्यात तिचा ‘हिरो’ तिला मिळालाच नाही....होय, तब्बूचं नाव अनेकांशी जोडलं गेलं. एका साऊथच्या हिरोसोबत तर ती एक-दोन नव्हे तर दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. पण तब्बूची कुठलीच प्रेमकहाणी पूर्णत्वाला गेली नाही...

सर्वप्रथम अभिनेता संजय कपूर तिच्या आयुष्यात आला. तब्बू नवखी होती आणि संजय कपूर बºयापैकी नावारूपास आला होता.अभिनेता संजय कपूर याच्यासोबत तब्बूचे अफेअर होते. यावेळी तिचे करिअर नुकतेच उदयास येऊ लागले होते. संजय कपूरसोबतच ‘प्रेम’ या चित्रपटातून तब्बूनं डेब्यू केला होता. असं म्हणतात की, कॅमे-यासमोर रोमान्स करता करता तब्बू व संजय कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण चित्रपट संपला आणि हे नातंही संपलं. या तुटलेल्या नात्यातून तब्बूनं एक धडा मात्र घेतला. तो म्हणजे, करिअरवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा. या ब्रेकअपनंतर तिने तिचे पूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित केले.

संजय कपूरचा एपिसोड संपला होता आणि अशात   दिग्दर्शक-निर्माता साजिद नाडियाडवाला याच्यासोबत तब्बूचं नाव जोडलं गेलं. या नात्यांच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पण तब्बूच्या मित्रांच्या मते, या निव्वळ अफवा होत्या. तब्बू दिव्या भारतीची मैत्रिण होती आणि त्यामुळे ती साजिदची मदत करत होती. जेणेकरून दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीतून साजिदला बाहेर काढू शकेल. दिव्याच्या मृत्यूनंतर  तब्बूने साजिदला मोठा आधार दिला. पण साजिद दिव्याला विसरू शकला नाही. अखेर तब्बूनेच त्याच्यापासून दूर जाणं पसंत केलं.

 यानंतर तब्बूच्या आयुष्यात एन्ट्री झाली ती साऊथ सुपरस्टार नागार्जुनची.  नागार्जुन हा विवाहित होता. पण तब्बू त्याच्या प्रेमात पडली.  तब्बू त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून हैदराबादेत नागार्जुन राहायचा अगदी तिथेच घर घेतलं होतं.तब्बूने अनेक वर्षे नागार्जुनची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट राजी नव्हता. तब्बूला कमिटमेंट हवी होती आणि नागार्जुन यासाठी राजी नव्हता. अखेर तब्बूने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि 2012 मध्ये दोघेही कायमचे वेगळे झाले.

अभिनेता अजय देवगणसोबत सुद्धा तब्बूचे नाव जोडलं गेलं. मात्र आम्ही दोघे केवळ चांगले मित्र असल्याचा खुलासा खुद्द तब्बूने केला होता. ‘माझ्याकडे कोणी नजर वर करून  पाहिलं तरी अजय त्याचा पिच्छा पुरवायचा. कॉलेजमध्ये असल्यापासून अजयने कुणालाच माझ्यापर्यंत पोहचू दिलं नाही. म्हणूनच मी अद्याप सिंगल आहे,’ असं तब्बू एकदा चेष्टेत म्हणाली होती. 

टॅग्स :तब्बू