Join us

करणसिंग ग्रोव्हरसाठी बिप्सचे ‘स्वीट’ सरप्राइज!

By admin | Updated: February 25, 2016 03:32 IST

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी कधीच त्यांची रिलेशनशिप सर्वांसमोर मान्य केली नाही, पण ते त्यांच्या रोमान्सविषयी सातत्याने काही ना काही अपडेट्स देतच असतात.

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांनी कधीच त्यांची रिलेशनशिप सर्वांसमोर मान्य केली नाही, पण ते त्यांच्या रोमान्सविषयी सातत्याने काही ना काही अपडेट्स देतच असतात. नुकताच करणसिंगचा वाढदिवस साजरा झाला. त्या वेळी बिप्सने अनेक केक त्याच्यासाठी आणले होते. त्यावर ‘मंकी’ असे लिहिले होते. गंमत अशीही आहे की, बिप्सच्या बर्थडेलाही करणसिंग ग्रोव्हरने असाच एक केक त्यावर ‘मंकी’ असे लिहून आणला होता. खरं तर यात काय जोक आहे, असे आपल्याला वाटेल. तिने इन्स्ट्राग्रामवर त्यांच्या सेलिब्रेशनचा फोटो अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘हॅप्पी बर्थडे अ‍ॅट करणसिंग! हॅपीनेस हॅपीनेस अँड मोअर हॅपीनेस फॉर यू फ ॉरेव्हर. स्टे द वे यू आर : लव्ह लव्ह लव्ह...’