Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिपाशा हरमनचा आॅनस्क्रीन रोमान्स

By admin | Updated: September 27, 2014 00:54 IST

बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांचे अफेअर सुरू होते, तेव्हा त्या दोघांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे.

बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांचे अफेअर सुरू होते, तेव्हा त्या दोघांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता बिपाशा आणि हरमन बावेजा सोबत आहेत. सध्या दोघांच्याही करिअरला एका हिट चित्रपटाची आवश्यकता आहे. त्यामुळे या दोघांना घेऊन एक चित्रपट बनवण्याची तयारी मुकेश भट्ट यांनी केल्याचे समजते. असे झाले तर ही रियल लाईफ जोडी रील लाईफमध्येही रोमान्स करताना दिसेल. बिपाशाचा क्रिएचर थ्रीडी नुकताच रिलीज झाला आहे, पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही, दुसरीकडे ढिश्कियाऊं या चित्रपटातून दुसरी इनिंग सुरू करणाऱ्या हरमनचीही अपयशाने पाठ सोडली नाही. आता बिपाशासोबत जोडी जमल्याने तरी त्याला यश मिळते का, ते येणाऱ्या काळातच कळू शकेल.