Join us

बिपाशा बासूनं हनिमुनचे फोटो केले शेअर

By admin | Updated: May 9, 2016 21:44 IST

बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर विवाहानंतर आता हनिमूनचा आनंद लुटत आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर विवाहानंतर आता हनिमूनचा आनंद लुटत आहेत. ३० एप्रिलला बिपाशा आणि करणचा विवाह झाला. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो समुद्रावरचे आहेत. 
 
निवांत सागराचे सौदर्य या फोटोंमध्ये दिसते. बिपाशा-करणने हनिमूनसाठी मालदीवची निवड केली आहे. शनिवारी दोघे हनिमूनला रवाना झाले. विवाहानंतर बिपाशा-करण दोघेही मित्र-नातेवाईकांना डिनर पाटर्या देण्यामध्ये व्यस्त होते. मालदीव दोघांचेही आवडते ठिकाण असून, १३ मे रोजी दोघे भारतात परतणार आहेत. 
 
२०१५ मध्ये अलोन चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले त्यावेळी दोघांच्याही मनात प्रेमाची पालवी फुलली. त्यानंतर मिडीयामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. करणचा हा तिसरा विवाह आहे.