Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वाढदिवशी सईचं स्पेशल मॅटर्निटी फोटोशूट; चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 15:02 IST

Sai lokur: सई आणि तीर्थदीप यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) माध्यमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर (sai lokur). बिग बॉसमुळे सईला विशेष लोकप्रियता मिळाली. परंतु, आता तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. सध्या सई तिचा प्रेग्नंसी पिरीअड एन्जॉय करत आहे. अलिकडेच सईने तिचं मॅटर्निटी शूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिने तिच्या प्रेग्नंसीचे अनेक अपडेट चाहत्यांना दिले आहेत. यात तिने आतापर्यंत बऱ्याच वेळा मॅटर्निटी फोटोशूट केलं. मात्र, यावेळी केलेलं फोटोशूट जरा खास आहे. सईने तिच्या लग्नाच्या वाढदिवशीच पुन्हा एकदा नव्याने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधील अनेक फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सई आणि तीर्थदीप रॉय यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. त्यामुळे लग्नाची तिसरी अॅनिव्हर्सरी कायम लक्षात रहावी यासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. यावेळी सईने पिंक आणि ब्ल्यू या दोन रंगांचं कॉम्बिनेशन करत छान गाऊन परिधान केला होता. सोबतच त्याला सुटेबल मेकअप आणि हेअर स्टाइलही केली होती. त्याच बरोबर तीर्थदीपनेही फॉर्मल कपडे घातले होते.

दरम्यान, सई आणि तीर्थदीप यांनी ३० नोव्हेंबर २०२० रोजी लग्नगाठ बांधली. बंगाली आणि महाराष्ट्रीयन अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर सई आई होणार आहे. त्यामुळे तिच्या या प्रेग्नंसी काळातील अनेक अपडेट ती चाहत्यांना देत आहेत

टॅग्स :सई लोकूरबिग बॉस मराठीसेलिब्रिटीटेलिव्हिजन