बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. घरात एक टोळी बनली आहे जिने दुसऱ्या गटाला चांगलंच भंडावून सोडलं आहे. टोळीतील एक सदस्य राधा पाटील मागच्या आठवड्यात घराबाहेर पडली. यानंतर अनुश्री मानेचा आवाज आणखी वाढला. मागच्या आठवड्यात भाऊचा धक्का झाला तेव्हा रितेशने अनुश्रीला चांगलंच धारेवर धरलं होतं. तर आता या आठवड्यात रितेश भाऊ प्रभू शेळकेला धक्का देणार आहे.
कलर्स मराठीने आजच्या भाऊचा धक्काचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये रितेश देशमुख प्रभू शेळकेला सुनावत आहे. रितेश म्हणतो, "प्रभू, तुम्ही हद्द पार केली आता...तुम्ही स्वत: म्हणालेलात की मी २० वर्षांचा आहे असं मला वागवा. आजपासून मी तुम्हाला तसंच वागवणार. दोन आठवडे तुमचं कौतुक झालं, तुमचे लाड झाले, आता तुमचा लाडात आलाय. उद्धटपणे वागताय, असभ्य बोलताय...आता बास झालं!"
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत समाधान व्यक्त केलं आहे. 'बरं झालं भाऊ बरं केलं..हा काही करत नाही नुसता विचित्र आवाज आणि टाईमपास...कुठे तो सुरज चव्हाण आणि कुठे हा...','हे पटलंय भाऊ...','भाऊ ऑन फायर. तर काहींनी प्रभू शेळकेची बाजूही घेतली आहे. 'त्याला का ओरडताय. दीपाली, रुचिता, अनुश्री वाटेल ते बोलतात त्यांना दत्तक घेतलंय का तुम्ही?','उद्धटपणे? अरे त्याला कुणी उगाच बोलत असेल तर त्याने का म्हणुन गप्प बसावे? तो सागर कारंडे असो किंवा सो कॉल्ड टोळी वाले ते जेव्हा याला काहीही बोलतात आणि दम द्यायला जातात तेव्हा तुम्हाला काही दिसत नाही?' अशा कमेंट्स प्रभू शेळकेच्या समर्थकांनी केल्या आहेत.
दरम्यान या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या आठवड्यात घरातील ८ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. सोनाली राऊत, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओंकार राऊत, रुचिता जामदार यांच्यापैकी एक जण या आठवड्यात एलिमिनेट होईल.
Web Summary : Riteish Deshmukh reprimands Prabhu Shelke on Bigg Boss Marathi 6 for his disrespectful conduct after receiving excessive praise and attention. The promo reveals Riteish's stern warning about Shelke's behavior.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में रितेश देशमुख ने प्रभु शेळके को अत्यधिक प्रशंसा और ध्यान मिलने के बाद उनके असभ्य आचरण के लिए फटकारा। प्रोमो में रितेश की शेळके के व्यवहार के बारे में सख्त चेतावनी का खुलासा किया गया है।