Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चं नवं अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या पर्वात प्रसिद्ध अभिनेता राकेश बापटही सहभागी झाला आहे. घरातील सदस्य एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये लग्नाबद्दल चर्चा रंगताना दिसली. करण सोनावणेला लग्नाचा सल्ला देताना राकेश बापटने त्याच्या एक्स पत्नीबद्दल भाष्य केलं.
राकेश बापट करणला म्हणला, "जर तुला लग्न करायचे असेल तर ते आताच कर, आयुष्यात हा लीप घे. लग्नाचा लाडू एकदा तरी खायलाच हवा". त्यावेळी करणने राकेशला त्याने जोडीदार कसा निवडला? असा प्रश्न विचारला. त्यावर राकेश म्हणाला, "मी माझ्या मैत्रिणीशी लग्न केलं होतं. मी काम करत असतानाच माझी जोडीदार मला भेटली. आम्ही एकाच शोमध्ये काम करत होतो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आणि त्यानंतर मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहतो आणि देखील माझ्या पाठीशी नेहमी असते. तिनेही लग्न केले नाही आणि मीदेखील लग्न केलेले नाही".
कोण आहे राकेशची एक्स पत्नी?
राकेशने अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्न केलं होतं. 'मर्यादा: लेकीन कब तक' या मालिकेच्या सेटवर ते एकमेकांना भेटले होते. २०११ मध्ये लग्न करत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. मात्र लग्नानंतर ८ वर्षांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
Web Summary : Raqesh Bapat, in Bigg Boss Marathi 6, discussed his ex-wife Riddhi Dogra, mentioning they are still friends and neither has remarried after their divorce in 2019, eight years after their marriage.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट ने अपनी एक्स-वाइफ रिद्धि डोगरा के बारे में बात की, उन्होंने कहा कि वे अभी भी दोस्त हैं और 2019 में तलाक के बाद दोनों ने दोबारा शादी नहीं की है।