Bigg Boss Marathi 6 : सध्या 'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व चांगलेच चर्चेत आले आहे. विविध कारणांमुळे या पर्वात सहभागी झालेल्या सदस्यांची चर्चा होताना दिसते. 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांमध्ये अनेक गोष्टींवरुन वादविवाद, मतभेद होत असलेले दिसतात. ज्या स्पर्धकांमध्ये उत्तम मैत्री आहे, त्यांच्यातही फूट पडताना दिसून येतेय. या घरातील समीकरणे दररोज बदलताना दिसतात. त्यामुळे कधी कोणती गोष्ट घडेल, कोणत्या वेळी भांडणे होतील, हे सांगता येत नाही. कलर्स मराठी वाहिनी 'बिग बॉस मराठी'चे विविध प्रोमो सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे दररोज पुढे काय होणार आहे, याची झलक त्यामधून दिसते. आता कलर्स मराठी वाहिनीने नुकताच शेअर केलेला एक प्रोमो लक्ष वेधून घेत आहे. या प्रोमोमध्ये राकेश बापट व तन्वी कोलते यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
बिग बॉसने सदस्यांना 'डेंजर की' पासून वाचण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टास्क दिला आहे. या टास्कदरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि चावी मिळवण्यासाठी स्पर्धकांची तंतोतंत धडपड सुरू आहे. प्रोमोमध्ये दिसते की, राकेशने तन्वीला घट्ट पकडून ठेवले आहे. यावेळी तन्वी राकेशला म्हणतेय, "सोड ना आरबी (राकेश बापट), हेल्दी गेम खेळ".
राकेशने पकडून ठेवल्यामुळे तन्वीला राग अनावर होतो. रागाच्या भरात तन्वी राकेशला उद्देशून "अकलेचा कांदा, नासका झालेला कांदा" असे म्हणताना दिसत आहे. तन्वीचे हे शब्द ऐकून राकेशही संतापतो आणि तिला "गप्प राहा" असे सांगतो. कलर्स मराठीने या प्रोमोला 'टास्कमध्ये होणार राकेश आणि तन्वीमध्ये घमासान भांडण' असे कॅप्शन दिले आहे.
Web Summary : Bigg Boss Marathi 6 witnesses a fierce fight between Rakesh Bapat and Tanvi Kolte during a task. Tanvi calls Rakesh a 'rotten onion,' sparking his anger. The task to avoid 'Danger Key' intensifies competition and conflict.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राकेश बापट और तन्वी कोलते के बीच एक टास्क के दौरान तीखी लड़ाई होती है। तन्वी ने राकेश को 'सड़ा प्याज' कहा, जिससे उसे गुस्सा आ गया। 'डेंजर की' से बचने का टास्क प्रतिस्पर्धा और संघर्ष को तेज करता है।