Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 6: राखी सावंतनंतर 'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री? चाहते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:27 IST

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आज मोठा धमाका होणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री होणार आहे. राखीपाठोपाठ आता अभिजीत बिचुकलेंनाही घरात आणण्याची मागणी होत आहे. 

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात आज मोठा धमाका होणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडियावरुन राखीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेताना दिसत आहे. राखीला बघताच घरातील सगळेच आश्चर्यचकित होत असल्याचं दिसत आहे. राखीच्या बिग बॉस मराठीच्या घरातील एन्ट्रीमुळे चाहतेही भलतेच खूश झाल्याचं दिसत आहे. राखीपाठोपाठ आता अभिजीत बिचुकलेंनाही घरात आणण्याची मागणी होत आहे. 

राखीच्या बिग बॉस मराठीच्या घरातील एन्ट्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "उद्यापासून बिग बॉस बघायला सुरू करणार", "आता खरी मज्जा येणार", "आता फक्त राडा होणार, "आता तर सगळेच फेल", "आता बिग बॉसमध्ये नुसता दंगा", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर राखीबरोबर अभिजीत बिचुकलेही बिग बॉसच्या घरात हवे होते, असंही अनेकांनी म्हटलं आहे. "अभिजीत बिचुकले पाहिजे होते", "आम्हाला अभिजीत बिचुकले हवेत", "बिचुकलेला पण आणा मग मजा पाहा", "आता अभिजीत बिचुकलेंना पण आणलं तर बरं होईल" असं चाहत्यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, राखीने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली असली तरी ती काही दिवसांसाठीच बिग बॉसच्या घरात असणार आहे. घरात एन्ट्री घेताच तिने तन्वी कोलतेशी पंगा घेतल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आता राखीने घरात एन्ट्री घेतल्याने कोणती समीकरणं बदलणार, गेम कसा बदलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याबरोबरच राखीच्या येण्याने घरात फूल ऑन ड्रामा पाहायला मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant enters Bigg Boss Marathi; fans want Bichukale too.

Web Summary : Rakhi Sawant's wild card entry into Bigg Boss Marathi 6 has excited fans. Many are now requesting the entry of Abhijit Bichukale as well, anticipating more drama and entertainment in the house.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६राखी सावंतअभिजीत बिचुकले