Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या चुरस वाढली आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी जिवाचं रान करत आहे. अशातच, घरातील सर्वात चर्चेत असलेला जालन्याचा 'छोटा डॉन' प्रभु शेळकेनं एका टास्कमध्ये राकेश बापटच्या तोंडचं पाणीच पळवल्याचं पाहायाला मिळालं.
बिग बॉसने दिलेल्या कॅप्टनसी टास्कमध्ये छोटा डॉन आणि राकेश आमने-सामने होते. सुरुवातीला राकेश वरचढ ठरेल असं वाटत होतं, पण छोट्या डॉनने आपल्या चपळाईने टास्कमध्ये अशी काही बाजी मारली की राकेश पूर्णपणे गोंधळून गेला. छोट्या डॉनच्या या खेळीमुळे घरात एकच हशा पिकला. या घटनेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी छोट्या डॉनचं कौतुक केलं आहे. "बारक्याला हलक्यात नाही घ्यायचा माय" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
कधी पाहता येईल? प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी' दररोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमावर हा शो कधीही उपलब्ध आहे. दरम्यान, या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत दिपाली सय्यद, अनुश्री माने, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
Web Summary : In Bigg Boss Marathi 6, Jalna's 'Chota Don' Prabhu Shelke outsmarted Rakesh Bapat during a captaincy task. Shelke's clever move caused laughter in the house. The promo went viral, with viewers praising Shelke's agility. The show airs on Colors Marathi and Jio Cinema.
Web Summary : बिग बॉस मराठी 6 में, जालना के 'छोटा डॉन' प्रभु शेळके ने कप्तानी कार्य के दौरान राकेश बापट को मात दी। शेळके की चतुराई भरी चाल से घर में हंसी का माहौल बन गया। प्रोमो वायरल हो गया, जिसमें दर्शकों ने शेळके की फुर्ती की प्रशंसा की। शो कलर्स मराठी और जियो सिनेमा पर प्रसारित होता है।