Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4: कोण जिंकणार 'बिग बॉस मराठी ४'ची ट्रॉफी? अवघ्या काही तासात होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 20:11 IST

Bigg Boss Marathi 4 : २ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४मध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे ५ स्पर्धक उरले आहेत.

बिग बॉस मराठीचं चौथे पर्व (Bigg Boss Marathi 4) आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी ८ जानेवारी रोजी रंगणार आहे. या सोहळ्यात कोण विजेता ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहेत. महाअंतिम पर्वाला सुरुवात झाली आहे आणि अवघ्या काही तासात विजेतेपदाची घोषणाही केली जाईल. त्यामुळे विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

२ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४मध्ये १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे ५ स्पर्धक उरले आहेत. महाअंतिम सोहळा या पाच स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. यांच्यापैकी एक जण बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जाईल.

कलर्स मराठी वाहिनीवर रविवारी ८ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या पाच स्पर्धकांच्या धमाल-मस्तीसह खेळातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांचे परफॉर्मन्सही पाहायला मिळत आहे.

'बिग बॉस खबरी' या इन्स्टाग्राम अकाउंटवर वोटिंग ट्रेंड शेअर करण्यात आला असून कोणाला जास्त मत असतील याचा अंदाज व्यक्त केला गेला. या ट्रेंडनुसार किरण माने पहिल्या क्रमाकांवर आहेत. अर्थात या ट्रेंडनुसार किरण माने यांना सर्वाधिक मतं मिळू शकतात. त्यांच्या पाठोपाठ राखी सावंत, त्यानंतर अपूर्वा नेमळेकर, चौथ्या क्रमांकावर अमृता धोंगडे आणि पाचव्या स्थानी अक्षय केळकर आहे. आता हा ट्रेंड कितपत खरा ठरेल हे स्पर्धेच्या शेवटीच समजेल.
टॅग्स :बिग बॉस मराठीअमृता धोंगडेराखी सावंतकिरण मानेअपूर्वा नेमळेकर