Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी शेवंता आणि प्रसादमध्ये राडा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 14:05 IST

बिग बॉसचं घर आणि वाद हे समीकरण तसं जुनचं आहे. घरात पहिल्याच दिवशी प्रसाद आणि अपूर्वामध्ये कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे.

बिग बॉसचं घर आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही. कालपासून सुरु झालेल्या बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी  अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादेमध्ये आज मत देण्यावरून कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे. या मुद्द्यावरून अपूर्वा आणि प्रसाद एकमेकांना जाब विचारताना दिसणार आहेत. आता कुठे पाहिला दिवस आणि सदस्यांनी आपल्याविरोधात मत दिले हे त्यांना सहन होत नाहीये, पुढे टास्क सुरु झाल्यावर काय परिस्थिती होणार आहे ? किती वाद - विवाद बघायला मिळतील हे कळेलच. 

अपूर्वाने तिचे मत सांगायला सुरुवात केली पण कुठेतरी ते प्रसादला पटलं नाही आणि त्यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आले. अपूर्वाचे म्हणणे आहे, हा कुस्तीचा खेळ नव्हे, आणि तुला असं का वाटतं कि तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा बेटर आहेस ? प्रसादचं म्हणणं पडलं जर हा कुस्तीचा खेळ नाहीये तर मग... अपूर्वा यावरून प्रसादवर भडकली “तू बोलू देणार आहेस का मला कि स्वतः एकटाच बोलणार आहेस ?” आणि वाद वाढतच गेला प्रसाद म्हणाला, “तू बोलीस त्यावर मी उत्तर दिलं तुला मी फक्त फास्ट ऐकलं बाकी काही नाही”. त्यावर शब्दाला शब्द वाढतं गेला अपूर्वाचे म्हणणे पडले “तू बोल, आता शांतपणे मी काय बोलते ते पण ऐक...हा कुस्तीचा खेळ नसल्याने त्याच्या बॉडीवर त्याला जज करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं, तो स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मला त्या स्ट्रॉंग स्पर्धकासोबत खेळायला जास्त आवडेल तुझ्या उद्धटपणापेक्षा. प्रसादला अपूर्वाचे हे म्हणणे पटले नाही, त्यावर तो म्हणाला “उद्धटपणा वैगरे अजिबात बोलू नकोस”... अपूर्वा म्हणाली, बोटं खाली करून बोल माझ्याशी, मला बिग बॉस यांनी माझं मत विचारलं मी तुझ्याविरोधात मत दिले.”

आज बघूया कोणी कोणाविरोधात मत दिले ? कोणामध्ये वाद झाले ? कोण कोणाशी सहमत झाले? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर. 

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकरटिव्ही कलाकार