Join us

Bigg Boss Marathi 3: तृप्ती देसाईंना हा सदस्य वाटतो 'लंबी रेस का घोडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 11:52 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य हे तीन सदस्य जाणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज तीन सदस्य तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य जाणार आहेत. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले.  स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती देसाई यांच्याकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.

तृप्ती देसाई म्हणाल्या, “विशाल एकदम मस्त... मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केला ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठेतरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हांला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही ! लंबी रेस का घोडा है !मस्त एकदम. 

मीरा आहे लक्ष्मी बॉम्ब - तृप्ती देसाई

तृप्ती देसाई यांनी पुढे सांगितले की, मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं...” तृप्तीताई मीराला म्हणाल्या तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेस, तर मीनलला म्हणाल्या तुम्ही सुतळी बॉम्ब खेळामध्ये. पुढे म्हणाल्या, मुलींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेयर आहात...” आज घरात काय घडले हे जाणून घेण्यासाठी आजचा बिग बॉस मराठी ३चा एपिसोड पाहावा लागेल.

टॅग्स :तृप्ती देसाईबिग बॉस मराठी