छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या घरात टास्क दरम्यान सदस्य एकमेकांवर नाराज नाही झाले किंवा त्यांच्यात मतभेद नाही झाले असे कमीच दिसून येते. काही ना काही कारणास्तव वाद विवाद हे होतातच. असं काहीसं होताना आज पुन्हा एकदा दिसून येणार आहे असे वाटते आहे. (Bigg Boss Marathi 3) टास्कच्या मध्ये टीममधील चर्चेत सुरेखा ताई थोड्या नाराज असल्याचे दिसून येणार आहे.
सुरेखाताईंनी टीमला विचारले, “तुमचं काय ठरतय मग. कसे करायचे”. यावर मीनल म्हणाली, “जेव्हा बजर वाजेल तेव्हा आपण निर्णय घेऊ काय करायचे. आता मी विचारत होते याची काय चर्चा झाली. तेव्हा उत्कर्ष त्याला कुठे ना कुठे कन्विन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. तू ये तुला सेफ करू. उत्कर्षच हेच सुरू आहे तो प्रत्येकाला वेगवेगळी कहाणी सांगतो आहे.
त्यावर तृप्ती ताई म्हणाल्या, “पण आता तर ते म्हणाले की त्यांनी विकासला सांगितला सुरेखाताईंना पाठवा”. त्यावर विकास म्हणाला “दादुस आमचे ठरलेले आहे”. त्यानंतर प्रत्येकाने त्यांची त्यांची नावे नावे दिली. मीनलने आविष्कारचे नाव घेतले, तृप्ती देसाई यांनी सुरेखाताईंचे नाव घेतले, विशाल म्हणाला आविष्कार. बहुमताने आविष्कार दारव्हेकरच नाव पुढे आल्यामुळे सुरेखा ताई म्हणाल्या मला माहिती होते हे म्हणूनच” आता नक्की काय झालं ? ते आजच्या भागात कळेल.