Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात गेलेल्या या जोडप्याचा झालाये घटस्फोट, जाणून घ्या कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 11:27 IST

Bigg Boss Marathi 3 : काल एकापेक्षा एक दमदार कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. घरात एण्ट्री करणाऱ्या सदस्यांमधील या दोन सदस्यांनी प्रेक्षकांचं खास लक्ष वेधून घेतलं....

ठळक मुद्दे‘बिग बॉस मराठी 3’मध्ये स्रेहा व अविष्कार यांच्यातील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळू शकते. बिग बॉसच्या घरात दोघांमधील नातं कोणत्या मार्गानं जातं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3 ) सुरू झालाय आणि आता या घरात जबरदस्त राडा पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये कोण कोण स्पर्धक भाग घेणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात अपार उत्सुकता होती. काल त्याावरूनही पडदा उठला. सोनाली पाटील, विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, तृप्ती देसाई अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. याशिवाय अन्य दोघांनी प्रेक्षकांचं खास लक्ष वेधून घेतलं. ते दोन कलाकार म्हणजे, स्रेहा वाघ (Sneha Wagh) व अविष्कार दारव्हेकर (Aavishkar Darwhekar).होय, स्रेहा वाघ ही हिंदी आणि मराठीतील लोकप्रिय चेहरा आहे. अविष्कार कोण तर, याच स्रेहाचा पूर्वाश्रमीचा पती आहे. होय, स्रेहा व अविष्कार कधीकाळी पती-पत्नी होते. आताश: दोघांचाही घटस्फोट झाला आहे. 

वयाच्या उणापु-या 19 व्या वर्षी स्रेहाने अविष्कारशी लग्नगाठ बांधली होती.  मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. एका मुलाखतीतमध्ये स्नेहा यावर बोलली होती. ‘  मी खूप काही सहन केलं. अखेर माझ्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या मदतीने मी यातून बाहेर पडू शकले. पतीच्या मारहाणीला बळी पडून त्यातून बाहेर पडू न शकणा-या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं,’ असं स्रेहा त्या मुलाखतीत म्हणाली होती.   

अविष्कारला घटस्फोट दिल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी स्नेहाने दुस-यांदा लग्न केलं.   इंटेरियर डिझायन असलेल्या अनुराग सोलंकीसोबत तिने दुस-यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्न सुद्धा फक्त आठ महिनेच टिकलं. स्नेहा दुस-या पतीपासून देखील विभक्त झाली.‘बिग बॉस मराठी 3’मध्ये स्रेहा व अविष्कार यांच्यातील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळू शकते. बिग बॉसच्या घरात दोघांमधील नातं कोणत्या मार्गानं जातं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीस्रेहा वाघ