बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनला सुरूवात होऊन काही दिवस उलटले आहेत आणि यंदाच्या पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. आतापर्यंत घरातून ४ सदस्य घराबाहेर पडले आहेत. त्यात किर्तनकार शिवलीला पाटील आजारी असल्याचे कारण देऊन घराबाहेर पडल्या आहेत. तर सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे हे नॉमिनेशन प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. नुकताच आदिश वैद्य घराबाहेर पडला आहे. त्याची वाइल्ड कार्डने एन्ट्री झाली होती. दरम्यान आता बिग बॉसच्या घरातून दादूसचे अपहरण झाल्याचे समजते आहे.
कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोत पहायला मिळते आहे की,दादूस कन्फेशन रूममध्ये असताना तिथे अचानक मास्क घातलेले दोन जण आले आणि दादूसला पकडून घेऊन गेले. अचानक झालेल्या त्यांच्या अपहरणामुळे घरातील सर्व सदस्य हैराण झालेले पहायला मिळत आहे. दादूसचे अपहरण का केले, कुणी केले, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात समजेल.
बिग बॉस मराठी सिझन ३ च्या या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील दोन लोकप्रिय सदस्य आले होते. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सीझन पहिल्याची विजेती अभिनेत्री मेघा धाडे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री रेशम टिपणीस. दोघींनी सदस्यांचे भरभरून कौतुक केले, तर काही सदस्यांना ते कुठे चुकत आहेत ते देखील सांगितले. तसेच सदस्यांसोबत एक मजेशीर गेमदेखील खेळताना दिसल्या.