Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: प्रतिक्षा संपली! 'BB Marathi 3'चा प्रोमो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:56 IST

BB Marathi 3 : दोन पर्वांना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या शोचं तिसरं पर्वदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे.

ठळक मुद्दे १९ सप्टेंबरपासून 'बिग बॉस मराठी ३' प्रेक्षकांच्या भेटीला

 छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी BB Marathi. पहिल्या दोन पर्वांना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या शोचं तिसरं पर्वदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे. नुकताच या शोचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला असून या व्हिडीओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर 'बिग बॉस ३' चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री भारती आचरेकर आणि अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर दिसून येत आहेत. 

दरम्यान,  बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजय ठरली होती. तर दुसऱ्या पर्वात शिव ठाकरेने बाजी मारत हे पर्व गाजवलं होतं. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १९ सप्टेंबरपासून 'बिग बॉस मराठी ३' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार