Join us

बिग बॉस मराठी 2 – आणि आरोहच्या डोळ्यात तरळले अश्रू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:05 IST

घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते.

बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये बर्‍याच घटना घडल्या. कालचा भाग खूपच भावूक करणारा ठरला.  काल घरामध्ये शिवची बहीण आणि आई, विणाची आई, अभिजीत केळकरची दोन मूलं आणि बायको घरामध्ये येऊन गेले. शिवच्या बहिणीने शिवची कानउघडणी केली आणि त्याला मार्गदर्शन केले, तर आईने शिवलाच खडसावले की सगळ्यांशी चांगले वाग, आमच्याशी भांडून तु या बिग बॉसच्या घरामध्ये आला आहेस तर विसरू नको तुझे ध्येय काय आहे.

तर अभिजीतच्या बायकोने अभिजीतला प्रोत्साहन दिले आणि उत्तम खेळत आहे असे सांगितले. तू जसा आहेस तसाच घरामध्ये वावरतो आहेस ते उत्तम आहे. तर त्याच्या मुलांनी घरातील एकूण एक सदस्यांना त्यांच्या नावाने ओळखले. आज घरामध्ये आरोहच्या घरातील खास सदस्य त्याला भेटायला येणार आहे. त्याने लिहिलेले पत्र वाचताना त्याला अश्रू अनावर झाले. 

Read Also- घरामध्ये पहिल्यांदाच घडले असे काही, चक्क हीनाच्या आईचे झाले अश्रू अनावर तर शिवानी आणि नेहाकडे केली 'ही' विनंती !

घरामध्ये सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. शिवानीच्या वडीलांनी, नचिकेत म्हणजेच नेहाच्या नवर्‍याने, हीनाच्या आईने सगळया सदस्यांशी आपुलकीने बातचीत केली. शिवानीने तिने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांना वाचून दाखवले तर नचिकेतने नेहाचे पत्र वाचले. हीनाच्या वडिलांचा आवाज आला ज्यामुळे तिला अश्रु अनावर झाले पण हीनाची आई घरामध्ये आली आणि हीनाचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. 

टॅग्स :आरोह वेलणकरबिग बॉस मराठी