Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : शिवानी जपतेय सामाजिक भान, वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:15 IST

‘बिग बॉस मराठी सिझन 2’ मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे

बिग बॉस मराठी सिझन 2’ मध्ये देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करत आहे. तिचे स्टाइलिश आउटफिट, एक्सेसरीज आणि शूजची क्रेझ तिच्या फॅन्समध्ये आहे. आता अभिनेत्री आहे, म्हटल्यावर कोणत्यातरी महागड्या डिझाइनरकडूनच तिने हे सर्व डिझाइन केलेले असणार , असे अनेकांना वाटत आहे. पण शिवानीच्या शूज मागचे डिझायनर कोण आहेत, हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

शिवानीचे शूज डिझाइनर जरूर आहेत. पण कोणत्याही महागड्या डिझाइनरने ते डिझाइन केलेले नसून दिव्यांग मुलांनी डिझाइन केलेले आहेत.

फिट मी अप एनजीओच्या मुलांनी डिझाइन केलेले हे शूज शिवानी सध्या घालत आहे. दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ काम करते. या संस्थेचा ‘फिट मी अप’ हा दिव्यांग मुलांना रोजगार मिळवण्यासाठी सुरू झालेला उपक्रम आहे.

फिट मी अपची संचालक प्रसन्नती अरोरा सांगते, “मी आणि माझी मैत्रिण दिपशिखाने २०११ला दिव्यांग मुलांसाठी ‘आय केअर लर्निंग स्कुल’ची सुरूवात केली. त्यांना सज्ञान झाल्यावर रोजगार मिळावा हे या मागचा उद्देश आहे. आणि आम्हांला आनंद आहे की शिवानी सुर्वेसारखे सेलिब्रिटीज आमच्या पुढाकाराला अशा पद्धतीने पाठिंबा देत आहेत.”

बिग बॉसच्या घरात जाण्याअगोदर शिवानी सुर्वे ह्यासंदर्भात सांगताना म्हणाली, “जरी ही मुले दिव्यांग असली तरीही कोणत्याही पारंगत डिझाइनर प्रमाणे त्यांनी शूज डिझाइन केले आहेत. त्यामुळे मी त्यांनी डिझाइन केलेले तीन-चार शूज घेऊन बिग बॉसमध्ये चाललीय. त्यांच्यासाठी माझ्या परीने उचललेला हा खारीचाच वाटा म्हणा ना.” 

टॅग्स :शिवानी सुर्वेबिग बॉस मराठी