Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी २ : पराग कान्हेरे बिग बॉस शोमधून Not Out ?, त्याची रवानगी झालीय सिक्रेट रूममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 17:41 IST

पराग बिग बॉसच्या घरात नसला तरी तो अद्याप शोमध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस मराठी' सीझन २ खूप चर्चेत आहे. एका महिन्यात बिग बॉसच्या घरात बऱ्याच घडामोडी घडताना पहायला मिळाल्या. शिवानी सुर्वे हिने तब्येतीमुळे हा शो सोडला तर अभिजीत बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केली. तर आता पराग कान्हेरे यालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र नुकत्याच प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये परागला बिग बॉसच्या घरातून सस्पेंड करण्यात आल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे तो या शोमधून बाहेर पडला नसल्याचं निश्चित झालं आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, पराग बिग बॉसच्या घरात नसला तरी तो अद्याप शोमध्ये आहे. त्याला सिक्रेट रुममध्ये पाठवण्यात आलं आहे. सिक्रेट रुममधून तो बिग बॉसच्या घरात काय चाललं आहे हे टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकणार आहे. 

बिग बॉसने स्पर्धकांना ‘टिकेल तो टिकेल’ हा टास्क दिला होता. या टास्क दरम्यान परागने नेहाच्या कानाखाली मारली आणि माधव देवचक्के, वैशाली माडे व अभिजीत केळकर यांच्यासोबतही त्याची मारामारी झाली. त्यामुळे लगेच हा टास्क थांबवण्यात आला.त्यानंतर परागला बिग बॉसच्या घरातून सस्पेंड करण्यात आलं. बिग बॉसने नेहाला परागला दुसरी संधी देण्याबाबत विचारलं. त्यावर नेहानेदेखील त्याला होकार दिला. त्यामुळे बिग बॉसने परागला मुख्य द्वाराबाहेर जाण्यास सांगितले. तिथून परागला सेक्रेट रुममध्ये नेण्यात आलं. तो सिक्रेट रुममध्ये किती दिवस राहणार, हे अद्याप समजू शकलेलं नाही. 

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेता राजेश शृंगारपुरे यालादेखील काही दिवसांसाठी सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आलं होतं.

टॅग्स :बिग बॉस मराठीपराग कान्हेरेनेहा शितोळेअभिजीत बिचुकलेशिवानी सुर्वे