Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरात कोण आहे बेचव हिंग, कोण केशर, कोण बदाम अन् कोण इलायची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 13:56 IST

‘बिग बॉस मराठी 2’ हा शो सध्या रंगात आला आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले.

ठळक मुद्देहिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे.

बिग बॉस मराठी 2’ हा शो सध्या रंगात आला आहे. वाद, चुगल्या, कुरघोडी हे बिग बॉसच्या घरासाठी नवे नाहीत. पण यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक गोष्ट बिग बॉसच्या घरात आहे. ते म्हणजे, मसाले. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. बिग बॉसच्या प्रतिस्पर्ध्यांना काही मसालेदार नावे मिळाली आहेत. हिंग, इलायची, केशर इत्यादी.

अजुनही तुमच्या लक्षात आले नसेल तर आम्ही सांगतो. होय,हिनाच्या एका चाहत्याने तिला चुगली केली आहे.  घरातील एका सदस्य तुला हिंग म्हणतो, जे बेचव असते, असे हा चाहता हिनाला सांगतो. आता हिनाला हिंग हे नाव कुणी दिले तर वीणाने. पण वीणाचे मानाल तर ही नावे तिने ठेवली नसून परागने ठेवली आहे. केवळ हिनालाच नाही तर किशोरी यांना केशर, वीणाला बदाम, रुपालीला इलायची असे नामकरण त्याने केले आहे.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे. पण खास बात म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे. त्यामुळे मलायकाची Look-Alike म्हणून हिना ओळखली जाते. हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते. पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत. यामध्ये हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१५ च्या फोर्ब्स इंडियाच्या १०० सेलिब्रिटाच्या यादीत हिनाचा  समावेश होता. हिना सोशल मीडियावर कमालीची अ?ॅक्टिव असते. स्वत:चे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.

  

टॅग्स :बिग बॉस मराठीहिना पांचाळवीणा जगताप