Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चोराला शोधा", मौल्यवान वस्तूची विमानात चोरी झाल्यानंतर गौहर खान संतापली, एअरलाइन कंपनीला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:56 IST

गौहर खानला दुबईवरुन मुंबईला येताना वाईट अनुभव आला. विमानात गौहर खानची मौल्यवान वस्तू चोरीला गेली.

प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौहरने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. अनेक चित्रपटांत गौहर खानने आयटम साँग केलं आहे. 'इश्कजादे'मधील 'झल्ला वल्ला' गाण्यामुळे गौहर खान प्रसिद्धीझोतात आली होती. गौहर तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीही ओळखली जाते. समाजातील अनेक घडामोडींवर गौहर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसते. 

गौहर खानला दुबईवरुन मुंबईला येताना वाईट अनुभव आला. विमानात गौहर खानची मौल्यवान वस्तू चोरीला गेली. तिचे गॉगल विमानातून चोरीला गेले आहेत. याबाबत गौहर खानने ट्वीटमधून संताप व्यक्त केला आहे. "अरे, माझा गॉगलची काल ek508 या दुबई ते मुंबई विमानात चोरी झाली आहे. माझे गॉगल विमानातच राहिले होते. विमानातून उतरल्यानंतर मी स्टाफला याबाबत माहिती दिली होती,"असं गौहरने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

"माझ्या सीटवर त्यांना 9j कंपनीचे गॉगल मिळाले होते. पण जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा पॉकेटमध्ये वेगळेच गॉगल होते, जे माझे नव्हते. मी तुमच्या हेल्पलाइन नंबरवरही कॉल केला होता. ईमेलही केला आहे, पण मला कोणतंच उत्तर मिळालं नाही. प्लीज चोर कोण आहे ते शोधा," असं म्हणत गौहर खानने संताप व्यक्त केला आहे. 

गौहर खानने २०२०मध्ये लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. १० मेला गौहर खानने गोंडस बाळाला जन्म दिला. तिच्या लेकाचं नाव जेहान असं आहे.  

टॅग्स :गौहर खानटिव्ही कलाकार