Join us

Bigg Boss 18: रविवारी दिसणार नाही सलमान खान, 'वीकेंड का वार'चं टायमिंगही बदललं, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 10:23 IST

रविवारी सलमान खान बिग बॉस होस्ट करताना दिसणार नाहीये. याबरोबरच वीकेंड का वारचं टायमिंगही बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८' सुरू होऊन एक महिना होत आला आहे. यंदाच्या पर्वात अनेक सरप्राइजेस चाहत्यांना मिळाले. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता रविवारी सलमान खानबिग बॉस होस्ट करताना दिसणार नाहीये. याबरोबरच वीकेंड का वारचं टायमिंगही बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

'बिग बॉस'च्या 'वीकेंड का वार'मध्ये भाईजान घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसायचा. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस 'बिग बॉस'च्या घरातील वीकेंड का वार असायचा. प्रेक्षकही या वीकेंड का वारसाठी आतुर असायचे. आता मात्र रविवारी वीकेंड वा वार होणार नाहीये. त्यामुळे सलमान रविवारी 'बिग बॉस'च्या सदस्यांची शाळा घेताना दिसणार नाही. पण, शनिवार आणि रविवार ऐवजी वींकेड का वार आता शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस होणार आहे. 

त्याबरोबरच वीकेंड का वारच्या टायमिंगमध्येही बदल करण्यात आले आहेत. 'बिग बॉस'चे अपडेट्स देणाऱ्या बिग बॉस तक या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत ट्वीट करण्यात आलं आहे. "आता सलमान खान फक्त शुक्रवार आणि शनिवारी दिसेल. शुक्रवार का वार रात्री १० वाजता आणि शनिवार का वार रात्री ९.३० वाजता", असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. यामागचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. 

टॅग्स :बिग बॉससलमान खान