Join us

"मी तुमची मोठी फॅन", भारती सिंगने केलं कौतुक, तर कृष्णाने केली नक्कल; 'बिग बॉस'च्या घरात फक्त गुणरत्न सदावर्तेंचीच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 14:01 IST

बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. भारती सिंगदेखील सदावर्तेंची फॅन झाली आहे. 

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंनी घरात त्यांचा दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी सदावर्ते एक आहेत. भारती सिंगदेखील सदावर्तेंची फॅन झाली आहे. 

बिग बॉसच्या घरात यंदाच्या सीझनमधील पहिला वीकेंड का वॉर होणार आहे. यामध्ये लाफ्टर शेफमधील कृष्णा अभिषेक, भारती सिंग हे कलाकार बिग बॉसच्या घरात येणार आहेत. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत भारती सिंग घरात आल्या आल्या गुणरत्न सदावर्तेंचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे. "मी तुमची मोठी फॅन आहे" असं भारती सदावर्तेंना म्हणते. त्यानंतर ती सदावर्तेंना त्यांची ओळख करून देण्यास सांगते. 

गुणरत्न सदावर्तेही त्यांच्या स्टाइलने ओळख करून देतात. तर नंतर कृष्णा अभिषेक सदावर्तेंची नक्कल करत असल्याचं दिसत आहे. "मी गुणरत्न सदावर्ते, मी वकील आहे. मी डॉक्टर आहे. मी डाकूंच्या खानदानातून आहे", असं कृष्णा म्हणत आहे. सदावर्तेंसारखा गॉगलही तू घालून आल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील हा मजेशीर व्हिडिओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

टॅग्स :बिग बॉसगुणरत्न सदावर्तेटिव्ही कलाकारभारती सिंगकृष्णा अभिषेक