Join us

Bigg Boss 17 Finale ची धमाकेदार सुरुवात, 'या' दोन स्पर्धकांनी फिनालेकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 19:33 IST

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे.

Bigg Boss 17 Finale: बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात टॉप 5 स्पर्धक आणि याआधी घरातून बाहेर पडलेले स्पर्धक आता बिग बॉसच्या घरात आले आहेत.  कॉमेडियन भारती सिंह आणि क्रिश्ना अभिषेक सर्व स्पर्धकांशी संवाद साधत असून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. क्रिश्ना यामध्ये जॅक श्रॉफच्या लूकमध्ये आला आहे. या सर्व स्पर्धकांमध्ये दोन स्पर्धक मात्र गायब आहेत. कोण आहेत ते माहितीये?

तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या बिग बॉस १७ मध्ये एकूण 20 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील-ऐश्वर्या या दोन जोड्या आल्या. शिवाय ईशा मालवीय, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, आयेशा खान, समर्थ जुरैल, मन्नारा चोप्रा, अनुराग डोबाल, सना खान,अरुण माशेट्टी, सनी आर्या, खानजादी, जिग्ना वोरा, रिंकू धवन, सोनिया बन्सल, मनस्वी ममगई आणि नाविद सोल या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला होता. या स्पर्धकांमधून दोन स्पर्धक फिनालेला आलेले नाहीत. ते म्हणजे अनुराग डोभाल (Anurag Dobhal) आणि खानजादी (Khanzadi). 

चाहत्यांनी विशेषत: खानजादीची आठवण काढली आहे.दरम्यान शोआधीपासूनच फिक्स असल्याचा आरोप अनुराग डोभालने काही वेळापूर्वीच लावला होता. त्याने नुकतंच अयोध्येत श्रीरामाचं दर्शनही घेतलं. अनुराग त्याच्या एविक्शनमुळे नाराजच होता. यामुळे त्याने फिनालेकडे पाठ फिरवली. तर खानजादीचा बिग बॉसमधला प्रवास विशेष नसल्याने तिनेही न येणंच पसंत केलं. यावेळी बिग बॉस फिनाले तब्बल सहा तास चालणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत फिनाले रंगणार आहे. अनेक सेलिब्रिटी फिनालेमध्ये येणार आहेत. तर १२ वाजता बिग बॉस 17 चा विजेता घोषित होणार आहे.

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसलमान खान