Join us  

Bigg Boss 15 : अभिजीत बिचुकले देवोलीनाच्या प्रेमात?; प्रतिक अन् तिची मैत्री पाहून झाले अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:45 PM

Abhijit bichukale: एकीकडे देवोलिना आणि प्रतिकची जवळीक वाढत असतानाच बिचुकले नाराज झाले आहेत. त्यांच्यातील ही मैत्री त्यांना फारशी रुचलेली नाही.

बिग बॉस मराठी (Bigg Boss marathi) फेम अभिजीत बिचुकले (abhijit bichukale) सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. मात्र, त्यांच्या अतरंगी कारनाम्यांमुळे ते सातत्याने चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांना देवोलीना भट्टाचार्जीसोबत (Devoleena Bhattacharjee) चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ते चक्क देवोलीनाच्या प्रेमात पडल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात ते देवोलीना आणि प्रतिकच्या (Pratik Sehejpal) मैत्रीमुळे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिचुकले, देवोलीना आणि प्रतिक यांच्यातील वाढत असलेली जवळीक पाहून खिन्न झाल्याचं दिसून येत आहे. सोबतच राखी, बिचुकलेंची मस्करी करताना दिसत आहे.

Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन

देवोलीनाने प्रतिकसमोर व्यक्त केल्या भावना

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देवोलीना गार्डन एरियामध्ये प्रतिक समोर तिचं मन मोकळं करते. तू ज्या पद्धतीने गेम खेळतोस ते मला खूप आवडतं. मला वाटतंय मी हळूहळू तुझ्याकडे ओढली जातीये. तुझ्यासोबत चांगला मित्र असल्याची फिलिंग मला येतंय, असं म्हणत देवोलीनाने प्रतिकचं कौतुक केलं. मात्र, त्यांना एकत्र पाहून बिचुकलेंचं मन खट्टू झालं होतं.

राखीने उडवली बिचुकलेंची मस्करी

एकीकडे देवोलिना आणि प्रतिकची जवळीक वाढत असतानाच बिचुकले नाराज झाले आहेत. त्यांच्यातील ही मैत्री त्यांना फारशी रुचलेली नाही. हे पाहून राखी त्यांची मस्करी करते. तुम्हाला ती आवडते ना? माहितीये दादा, असं राखी म्हणते. मात्र, तिच्या या वाक्यावर बिचुकले शांतपणे ऐकत असतात.

नाराज असलेल्या बिचुकलेंना उमरदेखील चिडवतो. फक्त दोन आठवड्यांमध्येच तुम्ही देवोलीनाशिवाय स्वत:ला एकटं समजताय. कसं व्हायचं, असं उमर म्हणतो. मात्र, त्याच्यावराही बिचुकले कोणतीच प्रतिक्रिया देत नाही. यावरुन बिचुकले खरंच देवोलीनाच्या प्रेमात पडलेत की काय? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करु लागले आहेत.

दरम्यान,अलिकडेच झालेल्या विकेंड वॉरमध्ये राखी सावंतचा पती रितेश आणि राजीव अदातिया यांना या शोमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे आता घरात केवळ रश्मी देसाई, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, राखी सावंत, उमर रियाज, शमिता शेट्टी, निशांत भट, अभिजीत बिचुकले, देवोलीना आणि प्रतीक सहजपाल हे स्पर्धक राहिले आहेत. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकारटेलिव्हिजनदेवोलिना भट्टाचार्जी