Join us

Bigg Boss 14: सिद्धार्थ शुक्लाच्या हातात आहे एलिमिनेशनचा गेम, बेघर करण्यासाठी सांगितले या तिघांचे नाव

By तेजल गावडे | Updated: October 19, 2020 17:49 IST

आता या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनची जबाबदारीदेखील सिद्धार्थ शुक्लाच्याच हातात आहे.

छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉस १४मध्येसिद्धार्थ शुक्लाच्या माध्यमातून गुरपालला बेघर करण्यात आले होते. त्यानंतर या शोच्या निर्मात्यांसोबत सीनियर सिद्धार्थ शुक्लालादेखील खूप ट्रोल करण्यात आले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सारा गुरपालने स्वतःदेखील सिद्धार्थच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता या आठवड्यात होणाऱ्या एलिमिनेशनची जबाबदारीदेखील सिद्धार्थ शुक्लाच्याच हातात आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी एलिमिनेशनची जबाबदारी सिनीयर सिद्धार्थ शुक्लाला सोपवली आहे. नुकतेच कलर्सने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खानने सांगितले की, आता वेटिंग लिस्टमधून तुमची बिग बॉसच्या घरातील सीट कन्फर्म होणार आहे. आता सर्व कंटेस्टंट्स एकेक करून सांगायचे आहे की तुमचा कोणता सदस्य बिग बॉसच्या कन्फर्म्ड लिस्टमध्ये दिसत नाही. 

त्यानंतर घरातील सर्व एकेक करून एकमेकांना नॉमिनेट करतात आणि चेहऱ्यावर स्प्रे करतात. एजाज खान, रूबीना दिलाइकला, पवित्रा पुनिया, जान कुमार सानूला, रुबीना दिलाइक राहुल वैद्यला आणि निक्की तांबोळी व राहुल वैद्य अभिनव शुक्लाला नॉमिनेट करत त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे करतात. याशिवाय सलमान खानने आणखीन एक टास्क दिले आहे ज्यात त्याने सर्व फ्रेशर्सचे दोन -दोन जोडीमध्ये नाव घेतले आणि एकेक स्क्रीनच्या मागे उभे राहयला सांगितले. सलमान खानने सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खानला सांगितले की तुम्ही सांगा की कोणत्या फ्रेशरला बिग बॉसच्या घरात पुढे पहायचे आहे. त्यानंतर तिन्ही सिनियर्स सर्व फ्रेशरला घेऊन आपला निर्णय सांगतात. 

सिद्धार्थ शुक्ला म्हणाला की, त्याला बिग बॉसच्या घरात रुबिना दिलाइक, निशांत मलकानी आणि राहुल वैद्यला पहायचे नाही. तर हिनाने जॅस्मिन भसीन आणि राहुल वैद्यचे नाव घेतले. गौहरने पवित्रा पुनिया, जान कुमार सानू आणि अभिनव शुक्ला यांना बिग बॉसच्या घरात पहायचे नसल्याचे सांगितले. मात्र या नावांवर तिघांची एकत्र सहमती दिसली नाही. त्यामुळे आगामी भागात कळेल की कोण घरातून बेघर होणार आहे.

टॅग्स :बिग बॉस १४सिद्धार्थ शुक्लाहिना खानगौहर खान