Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! सलमान खानला झाला लव्हेरिया, ही आहे भाग्यवान मुलगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 17:16 IST

सलमाननेच बिग बॉस या कार्यक्रमात याविषयी कबुली दिली आहे.

ठळक मुद्देसनी बिग बॉसच्या घरात जायला खूपच उत्सुक होती आणि घरातील सदस्य देखील सनीला भेटायला मिळणार म्हणून प्रचंड खूश झाले होते. केवळ घरातील सदस्यच नव्हे तर या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानदेखील तिला भेटून आनंदित झाला होता.

बिग बॉस १४ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका सलमान खान करत असून या कार्यक्रमात नुकतीच सनी लियोनीने हजेरी लावली होती. सनीच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. सनीचे चाहते जगभरात आहे. सनीवर सामान्य लोकच नाही तर बॉलिवूडचा दबंग खानदेखील फिदा आहे. सलमाननेच या गोष्टीविषयी नुकतेच बिग बॉसमध्ये सांगितले.

बिग बॉस १४ च्या विकेंड का वार या कार्यक्रमात सनी लियोनी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात सनी आणि सलमानने खूप धमाल मस्ती केली. एवढेच नव्हे तर सलमानने त्याच्या मनातली गोष्ट सनीला सांगितली. 

सनी बिग बॉसच्या पाचव्या पर्वात झळकली होती. तिला याच कार्यक्रमामुळे बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली. त्यामुळे तिच्यासाठी बिग बॉसचे घर हे खूपच खास आहे. सनी बिग बॉसच्या घरात जायला खूपच उत्सुक होती आणि घरातील सदस्य देखील सनीला भेटायला मिळणार म्हणून प्रचंड खूश झाले होते. केवळ घरातील सदस्यच नव्हे तर या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानदेखील तिला भेटून आनंदित झाला होता. बिग बॉसच्या या आगामी भागाचा प्रोमो प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला असून हा प्रोमो प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. कारण या प्रोमोत सनी लियोनी सलमानला विचारतेय, तुम्हाला कोणता आजार झाला आहे... त्यावर सलमान म्हणतो, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला लव्हेरिया झाला आहे. हे ऐकून सनी म्हणत आहे की, मला पण लव्हेरिया झाला आहे.

सनीचे हे उत्तर ऐकल्यावर सलमान हसत तिला अलिंगन देताना दिसत आहे. सलमानची ही फ्लर्टिंग पाहून उपस्थितांना हसू आवरत नाहीये.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस १४बिग बॉस