सध्या बिग बॉसचा १४ वा सीजन सुरू आहे. अशातच दिवसेंदिवस यात काही नवनवे ट्विस्टही पाहायला मिळत आहे. शोमध्ये होणारी चॅलेंजर्सची एन्ट्री अधिकजच मनोरंजक ठरत आहे. राखीचा कॉमेडी ड्रामाही पसंतीस उतरत आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात असलेल्यांना एक टास्क देण्यात आला. यामध्ये राखीला अभिनवच्या टीमवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. टास्कदरम्यान राहुल वैद्यचं अभिनव आणि रुबीना दिलाईकसोबत भांडण झालं. यादरम्यान राहुलनं रुबीनाला 'नालासोपाऱ्याची राणी' म्हणत खिल्ली उडवली. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना देण्यात आलेल्या टास्कमध्ये राखीला छतावरून अभिनवच्या टीमवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. राखीच्या टीममध्ये राहुल, अली, एजाज आणि सोनाली होते. तर अभिनवच्या टीममध्ये रुबीना, निक्की, अर्शी आणि विकास या सदस्यांचा समावेश होता. टाक्सदरम्यान, विकासनं शेजारील छतावरून येऊन कॅमेरा सोफ्याखाली लपवला. यानंतर राहुल वैद्य संतापला आणि त्याची रुबीना-अभिनवसोबत भांडण झालं.
Bigg Boss : "ही तर नालासोपाऱ्याची राणी"; राहुल वैद्यनं उडवली रुबीना दिलाईकची खिल्ली
By जयदीप दाभोळकर | Updated: January 14, 2021 15:05 IST
राहुल वैद्य, रुबीना दिलाईकमध्ये झालं होतं भांडण
Bigg Boss : ही तर नालासोपाऱ्याची राणी; राहुल वैद्यनं उडवली रुबीना दिलाईकची खिल्ली
ठळक मुद्देरुबीना, राहुल वैद्यमध्ये झालं होतं भांडण