Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात दोन आठवडे राहण्यासाठी सिद्धार्थ शुक्लाने घेतले इतके मानधन, वाचून व्हाल थक्क

By गीतांजली | Updated: October 10, 2020 16:39 IST

'बिग बॉस 14'मध्ये सिद्धार्थ शुक्ला तूफानी सीनिअरच्या भूमिकेत दिसतो आहे.

'बिग बॉस 14'मध्ये सिद्धार्थ शुक्ला तूफानी सीनिअरच्या भूमिकेत दिसतो आहे. सिद्धार्थ शोमध्ये दोन आठवडेच असणार आहे. सलमान खानच्या या शोचा हिस्सा बनवण्यासाठी मेकर्सनी त्याला एक मोठी रक्कम दिली आहे. रिपोर्टनुसार सिद्धार्थला बिग बॉसच्या घरात दोन आठवडे राहण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत.  

मेकर्सनी दिली सिद्धार्थला कोटींची फीसबॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार , सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस 14'मध्ये घरात दोन आठवडे राहणार आहे आणि यासाठी त्याला 12 कोटींच्या आसपास पैसे देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार गेल्या सीझनमध्ये सिद्धार्थ स्पर्धक म्हणून आला होता तेव्हा कसा होता आणि यासीझनमध्ये तो कसा आहे यावर खूप फरक पडतो. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ शुक्ला सोशल मीडियावरील स्टार झाला आहे. रिपोर्टनुसार, आधी सिद्धार्थने बिग बॉसच्या शोची ऑफर नाकारली होती नंतर मेकर्सनी त्याला मोठी फीस देऊन याशोसाठी तयार केले.  

बिग बॉस 14 मध्ये सिद्धार्थ शुक्लाशिवाय हिना खान आणि गौहार खान तुफानी सीनिअर्सच्या भूमिकेत दिसातेय. या सीझनमध्ये घरात जास्मीन भसीन, निक्की तांबोळी, पवित्रा पुनिया, रुबीका दिलाइक, सारा गुरपाल, जान सानू, राहुल वैद्य, एजाज खान आणि अभिनव शुक्ला सारखे अनेक कलाकार दिसतायेत. 

टॅग्स :बिग बॉस १४सिद्धार्थ शुक्ला