Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल वैद्यच्या गर्लफ्रेंडने केले 'बिकिनी शूट', शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 19:41 IST

'बिग बॉस 14' च्या फॅमिली स्पेशल वीकेंडच्या भागात राहुलच्या आईने हजेरी लावली होती.दिशाबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना दिसली होती. राहुलला

गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्यसह दिशा परमारचे अफेअर सुरु असल्याचे समोर येताच दिशा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल वैद्यनेही स्वतः बिग बॉसच्या घरात त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी प्रपोजही केलं होतं.

यावर दिशाने अजुन कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसला तरी या दोघांची लव्हस्टोरीमुळे सध्या दोघेही चर्चेत आहे. सोशल मीडियावर दिशा प्रचंड अॅक्टीव्ह असते. राहुल वैद्यला सपोर्ट करताना दिसते. त्यामुळे नक्कीच दिशाही राहुलसह लग्नासाठी तयार झाली आहे हे मात्र नक्की. दरम्यान  दिशा परमार आणि राहुल वैद्य यांचाआधीच साखरपुडा झाल्याच्याही चर्चा होत्या.

दिशाने वेळीच साखरपुड्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले होेत. राहुल आणि दिशा यांनी 'याद तेरी' म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केलं होतं. या व्हिडिओमध्ये दोघांच्या केमिस्ट्रीचं रसिकांकडून खूप कौतुकही झालं होतं. या नंतर दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली असल्याचे बोलले जाते.

'बिग बॉस 14' च्या फॅमिली स्पेशल वीकेंडच्या भागात राहुलच्या आईने हजेरी लावली होती.दिशाबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना दिसली होती. राहुलला सांगितले की सर्व काही ठरलं आहे, तूझीच वाट बघत आहोत. एकंदरित आईने राहुलला त्याच्या लग्नाबद्दलचा संकेत दिला होता. 

दिशाने तिचा ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो तिचा गोवा व्हॅकेशनदरम्यानचा आहे. फोटोत ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. दिशा परमारच्या या फोटोवर चाहतेच नाहीतर सेलिब्रिटीही लाईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळते आहे.

 

इतकेच काय तर या फोटोवर राहुल वैद्यच्या चाहत्यांनी दिशाला वहिनी म्हणून संबोधले आहे. यापूर्वीही दिशाने गोव्यातून आपले सुंदर फोटो शेअर केले होते.

टॅग्स :बिग बॉस १४