Join us

Sidharth Shukla Funeral Updates: शोकाकुल वातावरणात सिद्धार्थ शुक्लाला अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:36 IST

Sidharth Shukla dies of heart attack, Live Updates:‘ बिग बॉस’चा 13 वा सीझन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरूवारी निधन ...

03 Sep, 21 03:18 PM

सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ब्रम्हकुमारी रितीरिवाजामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्य संस्कार, शोकाकुल वातावरणात सिद्धार्थला अखेरचा निरोप. कुटुंबीय आणि सेलिब्रिटींचे अश्रू थांबेनात. 

03 Sep, 21 03:13 PM

बिग बॉस फेम निकी तांबोळीही पोहोचली

बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि सिद्धार्थची मैत्रिण निकी तांबोळी देखील सिद्धार्थच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचली.

03 Sep, 21 03:06 PM

मुंबईत जोरदार पाऊस, अंत्य संस्काराला होतोय उशीर

मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानं सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यासाठी थोडा उशीर होत आहे. ओशिवरा स्मशानभूमीवर सिद्धार्थचे कुटुंबीय आणि काही सेलिब्रिटी उपस्थित आहेत. 

03 Sep, 21 02:25 PM

सिद्धार्थचे कुटुंबीय ओशिवरा स्मशान भूमीवर पोहोचले

सिद्धार्थच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यासाठी त्याची आई आणि दोन बहिणींसह जवळचे नातेवाईक ओशिवरा स्मशानभूमीवर पोहोचले आहेत. बिग बॉस फेम शहनाज गिलनंही सिद्धार्थचं अंतिम दर्शन घेतलं. 

03 Sep, 21 02:14 PM

सिद्धार्थच्या निधानानं शहनाजला जबर धक्का

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधानाचा बिग बॉसची स्पर्धक आणि सिद्धार्थची मैत्रिण शहनाजला जबर धक्का बसला आहे. 

03 Sep, 21 01:46 PM

राखी सावंतही सिद्धार्थच्या घरी पोहोचली

अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक राखी सावंत देखील सिद्धार्थ शुक्लाच्या घरी पोहोचली. कुटुंबीयांची घेतली भेट

03 Sep, 21 01:07 PM

सिद्धार्थचं पार्थिव रुग्णालयातून रवाना

अभिनेता सिद्धार्थचं पार्थिव घेऊन अॅम्ब्युलन्स ओशिवरा स्मशानभूमीकडे रवाना, कुटुंबीय आणि सेलिब्रिटी थेट स्मशानभूमीवर पोहोचणार

03 Sep, 21 12:36 PM

आसिम रियाज, अली गोनी आणि प्रिन्स नरुला पोहोचले

बिग बॉस फेम आसिम रियाज, अली गोनी आणि प्रिन्स नरुला सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्य संस्कारासाठी पोहोचले

03 Sep, 21 12:14 PM

दिग्दर्शक करण जोहरनं वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनं वाहिली सिद्धार्थ शुक्ला याला श्रद्धांजली

03 Sep, 21 11:58 AM

सिद्धार्थ शुक्लाचे भावोजी आणि दोन बहिणी रुग्णालयात पोहोचले

थोड्याच वेळात सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिक कुटुंबीयांकडे सोपवलं जाईल. दुपारी दोन वाजता सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोलिसांच्या निर्देशानुसार सिद्धार्थचं पार्थिव जर घरी घेऊन जाण्यास नकार देण्यात आला तर थेट स्मशानभूमीवर पार्थिव नेण्यात येईल. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

03 Sep, 21 12:05 PM

सिद्धार्थचं पार्थिव थेट स्मशानभूमीवर नेणार, कुटुंबीय आणि सेलिब्रिटी हजर राहणार

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं पार्थिव कूपर रुग्णालयातून थेट ओशिवरा स्मशानभूमीकडे येण्यात येत आहे. कुटुंबीय आणि काही सेलिब्रिटी थेट स्मशानभूमीवर उपस्थित राहणार आहेत. याच अॅम्ब्युलन्समधून पार्थिव नेलं जाणार. 

03 Sep, 21 11:58 AM

अर्जुन बिजलानी पोहोचला सिद्धार्थच्या घरी

सिद्धार्थ शुक्लाच्या घरी अभिनेता अर्जुन बिजलानी पोहोचला आहे. अर्जुनसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटीदेखील सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.

03 Sep, 21 11:43 AM

सिद्धार्थच्या घरी अंत्य संस्काराची तयारी सुरु

ओशिवरा येथे सिद्धार्थच्या राहत्या घरी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली आहे. काही वेळापूर्वीच सिद्धार्थचं पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे.

03 Sep, 21 11:22 AM

सिद्धार्थचं पार्थिव घेण्यासाठी अॅम्ब्युलन्स रुग्णालयात पोहोचली

सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका नेमका अशामुळे आला याचं कारण कळू शकलेलं नाही. सिद्धार्थ पार्थिव घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्स रुग्णालयात पोहोचली आहे.

03 Sep, 21 11:19 AM

सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. डॉक्टरांनी आपलं कोणतंही मत रिपोर्टमध्ये व्यक्त केलेलं नाही. हिस्टोपॅथोलॉजिकल तपासणीनंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे निशाण आढळून आलेले नाहीत.

03 Sep, 21 11:09 AM

कूपर रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सिद्धार्थचं पार्थिव सध्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलं असून रुग्णालय परिसरात मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

03 Sep, 21 11:08 AM

सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आज येणार

कूपर रुग्णालयाकडून अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट थोड्याच वेळात सादर केला जाणार आहे. यातून सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाटेलिव्हिजनबिग बॉसबिग बॉस