Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 12: नेहा पेंडसेचा बिग बॉसमधला प्रवास संपला, या कारणामुळे झाली एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 09:12 IST

सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती.

बिग बॉसच्या घरातून मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा प्रवास संपला आहे. रविवारी रात्री नेहा पेंडसेची बिग ब़ॉसच्या घरातून एक्झिट झाल्याने तिच्या फॅन्सना जबरदस्त धक्का बसला. नेहा आणि करणवीर बोहरा आणि श्रीसंत हे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होते. यानंतर श्रीसंतला सिक्रेट रुममध्ये पाठवड्यात आलं. त्यामुळे नेहा पेंडसे आणि करणवीर या दोघांपैकी एक जण बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार होता. त्यामुळे कमी मतांच्या आधारे नेहा पेंडसे हिचा प्रवास बिग बॉसच्या घरातून संपला आहे. नेहाच्या या एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला असेल. मात्र तिची ही एक्झिट पूर्णपणे योजनाबद्ध होती अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी नेहाला गलेलठ्ठ मानधन देण्यात आलं होतं. मात्र त्या मानधनाच्या किंमतीला न्याय देणारा परफॉर्मन्स नेहाकडून बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत नव्हता. त्यातच श्रीसंतला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवणं बिग बॉस शोसाठी परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्याला सिक्रेट रूममध्ये पाठवून नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीला नेहाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. मात्र आपली इमेज चांगली बनवण्याच्या नादात सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य अशा दोन्ही स्पर्धकांच्या बाजूनं बोलताना नेहाची चांगलीच कोंडी झाली होती. 

मराठी सिनेमा, मालिका असो किंवा मग हिंदी मालिका या माध्यमातून नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सेक्सी आणि मादक अदांमुळे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' मालिकेत नेहा झळकली आणि नेहाचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. या मालिकेत नेहाने एका बॉसची भूमिका साकारली होती.तिच्या याभूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.नेहान अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची भाग्यविधाता ही मराठी मालिका तर प्रचंड गाजली होती. तसेच ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील झळकली आहे. सनी देओल आणि महिमा चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्यार कोई खेल नही या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.नेहाने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट-मालिका, हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  

टॅग्स :नेहा पेंडसेबिग बॉस 12