Join us

'बिग बीं'नी घेतली Lokmat CNX ची दखल

By admin | Updated: March 2, 2016 15:28 IST

चित्रपटसृष्टीचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी Lokmat CNX ची दखल घेत ट्विटरवरून कौतुक केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बॉलिवूडपासून-हॉलिवूडपर्यंतच्या सगळ्या बातम्या, सिनेमे, गॉसिप, स्टार्सच्या मुलाखती आपल्या वाचकांपर्यंत अस्सल मराठमोळ्या थाटात नॉन-स्टॉप पोहोचवण्यासाठी सदैव सज्ज असलेल्या 'Lokmat CNX'ची अनेक स्टार्सनी दखल घेतली आहे. लोकमतच्या या पेजचे कौतुक करणा-यांमध्ये आणखी एका सुपरस्टारचा समावेश झाला असून ते आहेत खुद्द अमिताभ बच्चन अर्थात सर्वांचे लाडके बिग बी.. 
आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून ट्विटर, फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत कनेक्टेड राहणा-या अमिताभ यांनी ट्विटरवरून लोकमत CNX ची खास दखल घेतली आहे. ' मराठी/ हिंदी चित्रपटसृष्टीतील बित्तंबातम्या देण्यासाठी लोकमतने आणले आहे Lokmat CNX FB page ' असे ट्विट करत त्यांनी लोकमतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 
 
 

मराठी कलाकारांनीही केले कौतुक