Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी भूमी पेडणेकर आणि रणदीप हुडा निघाले नातेवाईक; काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:04 IST

बॉलिवूडमधील दोन स्टार्स निघाले एकमेकांचे नातेवाईक! भूमी पेडणेकरने स्वतःच उघड केलं

बॉलिवूडमध्ये अनेकदा कलाकारांच्या मैत्रीच्या चर्चा रंगतात, पण काही कलाकार प्रत्यक्षात एकमेकांचे नातेवाईक आहेत, हे खूप कमी लोकांना ठाऊक असतं. असाच एक मोठा खुलासा अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने केला आहे. भूमी आणि रणदीप हुडा हे केवळ सहकलाकार नसून ते नात्याने दूरचे भाऊ-बहीण आहेत.

'मिड-डे'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत भूमीने या रंजक माहितीचा उलगडा केला. भूमी म्हणाली, "रणदीप आणि मी प्रत्यक्षात दूरचे चुलत भाऊ-बहीण आहोत. आमच्या आईच्या बाजूने आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत". 

 'हुडा' कनेक्शनभूमीने पुढे सांगितले की, "सर्व 'हुडा' हे हरियाणातील एका विशिष्ट भागातील आहेत. माझी आई हरियाणवी असून तिचे माहेरचे आडनाव 'हुडा' आहे. त्यामुळे हरियाणाच्या या विशिष्ट भागातील हुडा कुटुंबांची नाती एकमेकांशी जोडलेली असतात आणि अशाच प्रकारे रणदीप माझा नातेवाईक लागतो".

भूमी पेडणेकर आणि रणदीप हुडा हे दोन्ही कलाकार त्यांच्या 'मेथड ॲक्टिंग'साठी ओळखले जातात. भूमीने आपल्या पहिल्याच चित्रपटापासून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर रणदीप हुडा याने आपल्या अभिनयाने जगभरात नाव कमावले आहे. आता हे दोन्ही प्रतिभावान कलाकार नात्यानेही एकत्र असल्याचे समजल्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhumi Pednekar and Randeep Hooda are relatives; surprising connection revealed!

Web Summary : Bhumi Pednekar revealed she and Randeep Hooda are distant relatives through their mothers' side. Both belong to Huda families from Haryana. The talented actors are known for their acting skills.
टॅग्स :भूमी पेडणेकर रणदीप हुडा