Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलजीतचा आवाज अन् कार्तिक आर्यनच्या डान्सची जादू! 'भूल भूलैय्या ३'चं टायटल गाणं रिलीज होताच व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:20 IST

'भूल भूलैय्या ३'मधील ज्या गाण्याची सर्वजण ज्या गाण्याची सर्वजण वाट पाहत होते ते गाणं रिलीज झालंय (bhool bhulaiyya 3)

 'भूल भूलैय्या ३'ची सध्या उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमाची सध्या खूपच चर्चा आहे. इतकंच नव्हे 'भूल भूलैय्या ३' हा सिनेमा ट्विटरवर सुद्धा ट्रेंडींगला असतो. 'भूल भूलैय्या ३' च्या गाण्यांची सर्वांना उत्सुकता होती. अशातच काल सिनेमाच्या टीमने पहिलं गाणं अर्थात सिनेमाच्या टायटल ट्रॅकची घोषणा केलीय. नुकतंच  'भूल भूलैय्या ३'चं टायटल सॉंग रिलीज झालंय. कार्तिक आर्यनच्या डान्सची जादू आणि दिलजीत दोसांजच्या आवाजाची किमया  'भूल भूलैय्या ३'च्या टायटल सॉंगमध्ये दिसते. 

'भूल भूलैय्या ३' चं टायटल सॉंग

सर्वांना उत्सुकता होती 'भूल भूलैय्या ३'च्या टायटल सॉंगची. अखेर आज हे टायटल सॉंग रिलीज झालंय. या टायटल सॉंगला दिलजीत दोसांजने त्याचा खास आवाज दिलाय. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध अमेरिकन रॅपर पिटबूलने या गाण्यातील काही ओळी गायल्याने चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झालीय. या गाण्यावर कार्तिक आर्यन खास स्टेप करत जबरदस्त नाचताना दिसतोय. हे गाणं रिलीज होताच अल्पावधीत ते व्हायरल झालंय. आधीच्या दोन भागांप्रमाणे पुन्हा एकदा 'भूल भूलैय्या ३'चं टायटल सॉंग प्रेक्षकांना आवडलेलं दिसतंय. 

 'भूल भूलैय्या ३' सिनेमाविषयी

'भूल भूलैय्या ३' हा सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. 'भूल भुलैय्या'च्या पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय दुसऱ्या भागातील कियारा अडवाणी तिसऱ्या भागात दिसणार का हे सिनेमा आल्यावरच कळेल. दरम्यान 'भूल भूलैय्या ३' पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्यादिलजीत दोसांझविद्या बालनतृप्ती डिमरी