Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारती सिंग म्हणते, सिद्धू फाडून टाक

By admin | Updated: June 15, 2016 03:04 IST

सिद्धार्थ जाधव याच्या ‘गेला उडत’ या नाटकाची चर्चा सध्या फार जोरात आहे. या चर्चेचे उधाण हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील वाहत आहे. हिंदी विनोदी मालिकेतल्या भारती सिंगनेदेखील ‘गेला उडत’

सिद्धार्थ जाधव याच्या ‘गेला उडत’ या नाटकाची चर्चा सध्या फार जोरात आहे. या चर्चेचे उधाण हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील वाहत आहे. हिंदी विनोदी मालिकेतल्या भारती सिंगनेदेखील ‘गेला उडत’ नाटकाचे कौतुक केले आहे. भारती सिंग आणि सिद्धार्थ जाधव कॉमेडी नाइट बचाव या मालिकेत एकत्र अभिनय करतात. त्यामुळे भारतीलादेखील सिद्धूच्या नाटकाची पब्लिसिटी करण्याचा मोह आवरला नाही. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये भारती म्हणाली, ‘‘माझा भाऊ, दोस्त सिद्धार्थ जाधव याचे नवीन नाटक ‘गेला उडत’ हे सर्वांनी पाहा व त्याला भरभरून आशीर्वाद द्या,’’ असे आवाहनदेखील तिने केले आहे. त्याचबरोबर सिद्धूला शुभेच्छा देऊन ती म्हणाली, ‘‘सिद्धार्थ आपल्या अभिनयाने फाडून टाक.’’