Join us

"मी फालतू चित्रपट केले कारण..."; भरत जाधव यांची कबूली; म्हणाले- "मी ठाम आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:07 IST

भरत जाधव यांनी एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या सिनेमांबद्दल स्पष्ट अन् प्रांजळ कबूली दिली (bharat jadhav)

भरत जाधव (bharat jadhav) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. भरत यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. भरत जाधव यांचे सिनेमे म्हणजे हसवणूक आणि करमणूक यांची खात्री असते. भरत जाधव यांनी 'जत्रा', 'ह्यांचा काही नेम नाही', 'बकुळा नामदेव घोटाळे' इ. सिनेमांमधून कॉमेडी भूमिका साकारल्या. याशिवाय 'झिंक चिक झिंग', 'शिक्षणाच्या आयचा घो' अशा सिनेमांमधून गंभीर भूमिका साकारल्या. भरत यांनी एका मुलाखतीत "घर चालवण्यासाठी मी फालतू सिनेमे केले", असा खुलासा केलाय.भरत जाधव यांनी लोकल बंधन  या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "नाटकात खरंच पैसा नाही. नाटकासाठी एक ठराविक रक्कम असते. मला समाधान काय देतंय तर नाटक. पण ते करताना तुम्ही समाधानी आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून काय तुम्ही नाटकच केलं पाहिजे असं नाही. तुम्ही चित्रपटही केले पाहिजेत. मालिकाही करायला हव्यात. पण या गोष्टी करता करता तुमच्यातला अभिनेता मरु देऊ नका. मी नाटकात फालतू नाटकं कधीच केली नाहीत. चांगलीच नाटकं केली.""चित्रपटात मी फालतू पिक्चर केले कारण माझं घर चाललं पाहिजे. पण मराठीत इतका पैसा नाही की एवढ्या मोठ्या जास्त प्रॉपर्टी होतील. मला कळतं की, माझे पिक्चर बरे चाललेत. मला आता सिनेमातून चांगले पैसे मिळायला लागलेत. असं जरी असलं तरीही मी ते चालू असताना नाटक सोडलं नाही. आज मी या गोष्टीवर ठाम झालो की, जाऊदे चित्रपट. आता बास झाले. सिनेमे वाटलं तर करेन नाहीतर नाही. पण माझं नाटक चालू आहे."

टॅग्स :भरत जाधवमराठीमराठी अभिनेता