काहीसा ‘दुनियादारी’ सोडला तर स्वप्निल जोशीने सगळेच रोमँटिक चित्रपट केले असल्याने ‘लव्हर बॉय’ अशी त्याची इमेज चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण झाली आहे. पण आगामी ‘फ्रेंड्स’ चित्रपटात हा लव्हर बॉय बेस्ट फ्रेंडमध्ये परावर्तित झाला आहे.‘शोले’मधल्या जय-वीरूसारखी स्वप्निल आणि सचित पाटीलची जोडीदेखील मराठी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल नेटवर्किंग साइटवर नेटिझन्सची त्याला पसंतीदेखील मिळत आहे. ‘नील’च्या भूमिकेमध्ये स्वप्निलचे दर्शन घडणार असून, स्वत:च्या तत्त्वांवर जीवन जगणारा नील मैत्रीसाठी तत्त्वांना मुरड घालणार का? हे केवळ काळच सांगू शकणार आहे. सचितची व्यक्तिरेखा अद्याप गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आर. मधेश यांचे आहे. या दोघांशिवाय गौरी नलावडे, नेहा महाजन आणि सागर कारंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लव्हर बॉय ते बेस्ट फ्रेंडचा प्रवास
By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST