Join us

'बेवॉच'च्या पोस्टरनं प्रियंकाचे चाहते घायाळ

By admin | Updated: November 1, 2016 07:20 IST

प्रियंका चोप्रा हिनं तिच्या आगामी हॉलिवूडपटाचं हॅलोवीन स्वरूपातील स्पेशल पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं आहे.

ऑनलाइन लोकमतलॉस एंजलिस, दि. 1 - बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर असलेली आणि हॉलिवूडमध्ये नशीब आजमावणारी आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनं तिच्या आगामी हॉलिवूडपटाचं हॅलोवीन स्वरूपातील स्पेशल पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं आहे. या पोस्टरमध्ये प्रियंका चोप्रा वटवाघळाच्या रूपात पाहायला मिळत आहे. "मी तुम्हाला पाहते आहे. बू वॉच बी बॅड, बेवॉच मूव्ही, सर्वांना हॅपी हॅलोवीन", असं ट्विट करून प्रियंकानं चाहत्यांना आगामी हॉलिवूडपटाची झलक दाखवली आहे. या पोस्टरमध्ये 34 वर्षांच्या प्रियंकानं ब्लॅक वन शोल्डर आणि हाय स्लिट गाऊन परिधान केलं आहे. बेवॉच या हॉलिवूडपटात प्रियंकासोबत झॅक एफ्रॉन, ड्वेन जॉन्सन, एलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस दिसणार आहेत. या हॉलिवूडपटाचं मुख्य पोस्टर जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्या पोस्टरमध्ये या हॉलिवूडपटातील सर्व पात्रांना दाखवण्यात आलं होतं. पुढच्या वर्षी 19 मे रोजी हा हॉलिवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रियंकानं ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमुळे तिच्या आगामी हॉलिवूडपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.