Join us

दीपिकाच्या क्षमतेवर विश्वास

By admin | Updated: July 3, 2014 13:40 IST

नखरे पूर्ण करता करता दिग्दर्शकांच्या नाकीनऊ येतात, असे अनेक कलावंत बॉलीवूडमध्ये आहेत. पण दीपिका पदुकोण त्यापैकी नाही.

नखरे पूर्ण करता करता दिग्दर्शकांच्या नाकीनऊ येतात, असे अनेक कलावंत बॉलीवूडमध्ये आहेत. पण दीपिका पदुकोण त्यापैकी नाही. तिने ज्यांच्यासोबत पूर्वीही काम केले आहे त्यात दिग्दर्शकांसोबत आगामी चित्रपटांमध्ये ती काम करताना दिसेल, यावर्षी दीपिकाचे ‘फार्इंडिंग फॅनी’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ हे चित्रपट रिलीज होत आहेत. ‘फार्इंडिंग फॅनी’चे दिग्दर्शन होमी अडजानिया करणार आहे. चित्रपटात रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरच्या लहान भूमिका असतील. फराह खानसोबतचा तिचा दुसरा चित्रपट ‘हॅप्पी न्यू ईअर’ही या वर्षी प्रदर्शित होईल. ‘ओम शांति ओम’ या फराहच्या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. त्याशिवाय संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ आणि इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’मध्येही ती मुख्य भूमिकेत दिसेल.