Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजस्थान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'ची उद्यापासून सुरुवात

By admin | Updated: January 13, 2017 16:19 IST

पिंकसिटी म्हणून ओळखल्या जाणा-या जयपूर शहरामध्ये उद्यापासून तिस-या 'राजस्थान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. 13 - पिंकसिटी म्हणून ओळखल्या जाणा-या जयपूर शहरामध्ये उद्यापासून तिस-या 'राजस्थान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये जगभरातून आलेल्या 20 फिचर चित्रपटांसह 87 चित्रपट दाखविले जाणार आहेत. तसेच, टॉक शो, माहितीपट, पॅनेल चर्चा आणि वर्कशॉप्स अशा कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा या फेस्टिव्हमध्ये करण्यात आले आहे. 
'राजस्थान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'मध्ये स्क्रिनिंगवर एकूण 87 चित्रपट दाखविले जाणार असून यामध्ये  20 फिचर चित्रपट, 10 माहितीपट, 8 भाषिक चित्रपट, 30 लघुपट आणि 19 आंतरराष्ट्रीय चित्रपट आहेत, अशी माहिती फेस्टिव्हलचे संस्थापक सोमेंद्र हर्ष यांनी दिली.