Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डंकी' च्या रिलीजआधी सेन्सॉर बोर्डाने सांगितले बदल, शाहरुखच्या 'त्या' सीनवर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:36 IST

शाहरुख खान, तापसी पन्नू यांच्या 'डंकी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा (Shahrukh Khan)  'पठाण' आणि 'जवान'नंतर 'डंकी' (Dunki) सिनेमा रिलीज होत आहे. 2023 वर्ष सुरु होताच शाहरुखने दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले तर आता वर्षाच्या शेवटी रिलीज होणाऱ्या 'डंकी' सिनेमाकडूनही त्याला अपेक्षा आहेत. तसंच या सिनेमातून शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम करत आहे. 21 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या 'डंकी' मधून सेन्सॉर बोर्डाने एका सीनला कात्री लावली असल्याची माहिती समोर आली आहे. 

शाहरुख खान, तापसी पन्नू यांच्या 'डंकी' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सेन्सॉर बोर्डाने नुकतंच सिनेमा पास केला आहे. तसंच काही कट्सही सांगितले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. शिवाय सिनेमाचा रनटाईम समोर आला आहे. 2 तास 41 मिनिटांचा हा सिनेमा असणार आहे. माध्यम रिपोर्टनुसार, सिनेमात वापरलेला 'अप्रवासी' हा शब्द बदलण्यात आला आहे. तसंच सिनेमाच्या सुरुवातीला आणि शेवटी धुम्रपान विरोधी इशारा देण्यास सांगितले आहे. याशिवाय सिनेमात एका सीनमध्ये हार्डी म्हणजेच शाहरुख वर्दी घालून घोड्यावर बसलेला दिसतो. हा सीनही बोर्डाने बदलण्यास सांगितले आहे. 

'डंकी' मध्ये आत्महत्येचाही एक सीन आहे. या सीनवर सेन्सॉर बोर्डाने सूचना केली आहे. या सीनसोबत एक चेतावनीचा मेसेज देणं अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. 'आत्महत्या कोणत्याही अडचणीवरील एकमेव उपाय नाही' असं लिहिण्यास सांगितलं आहे. 21 डिसेंबरला 'डंकी' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'डंकी'च्या प्रमोशननिमित्त शाहरुख दुबईला रवाना झाला आहे.

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपटतापसी पन्नूराजकुमार हिरानीबॉलिवूड